Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या मनावर राज्य केले होते, त्याचपाठोपाठ धुरंधर २ या सिनेमानेही सर्वांवर आपली छाप सोडली आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे. सहसा बहुतेक चित्रपट थोड्याच हफ्त्यात आपला सिनेमागृहांवरून आपला गाशा गुंडाळतात, परंतु रिलीज नंतर १९ दिवस उलटूनही धुरंधर २ हा चित्रपट अजूनही ठाण मांडून बसला आहे.


या सिनेमाची छाप ही सर्वांच्याच मनावर पडली. अगदी सामान्य प्रेक्षक वर्गापासून ते नेतेमंडळी, ज्येष्ठ अभिनेता - अभिनेत्री आणि आता चक्क क्रिकेटच्या देवाला विराट आणि अनुष्काला देखील या सिनेमाची भुरळ पडली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत. सिनेमाबद्दल स्तुतीसुमने उधळली आहेत.


विराट कोहली याने सिनेमात पहिला असून आपला रिव्ह्यू इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. त्यानं लिहिलंय की, सिनेमाच्या चार तासांच्या कालावधीत त्याला स्क्रीनवरून एका क्षणाचाही आपली नजर हटवता आली नाही. कोहलीनं लिहिलंय की, मी आज धुरंधर २ सिनेमा पहिला आणि मी पूर्ण आत्मविश्वासानं असं म्हणू शकतो की भारतात मी यापूर्वी अशाप्रकारचे सिनेमे केव्हाव्ही पहिले नाही. मी जवळपास चार तास जागेवरून एका क्षणासाठीही हललो नाही.


दिग्दर्शक आदित्य धरवरही कोहलीनं स्तुतिसुमनं उधळली "तुम्ही निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तुमची प्रतिभा आणि समर्पण स्पष्टपणे दिसतंय. तुम्हाला माझा सलाम! तुम्ही खरोखरंच एक अद्भूत आहात..." अभिनेता रणवीर सिंहबद्दल बोलताना म्हणाला की, या सिनेमानंतर तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे तुमचा अभिनय केवळ अप्रतिमच नव्हे, तर त्याहूनही कितीतरी श्रेष्ठ आहात.



अनुष्का म्हणते की


आदित्य धरला टॅग करत अनुष्काने लिहिले: "तुम्ही अप्रतिम चित्रपट बनवला आहे, ४ तासांचा असे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिनेमे बनवायला खूप धाडस लागत, यात अनेक बारीक आब्रिक गोष्टींवर लक्ष ठेवले गेले आहे तुम्ही एक अत्यंत मौलिक आणि आत्मविश्वासू चित्रपट निर्माते आहात."


आपला पहिला सहकलाकार रणवीर सिंगच्या 'उत्कृष्ट' अभिनयाचे कौतुक करत अनुष्काने लिहिले: "तू आयुष्यात एकदाच मिळणारी भूमिका साकारलीस आणि एक दमदार, निर्दोष अभिनय सादर केलास." अनुष्का


"माधवन, रामपाल, राकेश बेदी सर आणि चित्रपटातील प्रत्येक उत्कृष्ट कलाकार—प्रत्येकाचा अभिनय अगदी अचूक आहे; तुमच्या प्रत्येकाशिवाय या चित्रपटाची कल्पनाच करता येत नाही. यामागे असलेल्या प्रत्येकाचे खूप खूप अभिनंदन," असे अनुष्का पुढे म्हणाली


‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमांची मालिका सुरू ठेवली आहे. चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला असून, भारतात सुमारे 1134 कोटी आणि जागतिक स्तरावर 1500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. रोजच्या कमाईतही सातत्याने वाढ होत असल्याने चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे.


एकीकडे बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड आणि दुसरीकडे विराटसारख्या मोठ्या नावाकडून मिळालेलं कौतुक, यामुळे ‘धुरंधर 2’ची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी सर्वाना खात्री आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट