मुंबई :आई लेकीच्या नात्याला काळिमा फासनारी गोष्ट नालासोपारा येथे घडली आहे.आईने स्वताच्या मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला ठार मारले आहे.या घटने मुळे तेथील परिसरामध्ये खळखळ उडाली आहे.मृत मुलीचे नाव अंबिका प्रजापत्ती (वय १५) व आईचे नाव कुमकुम प्रजापती असं आहे.
प्रजापती कुटुंब नालासोपारा येथील संतोषभवन परिसरातील तांडापाडा भागात, विद्या विकासने चाळीत येथे राहण्यास होते. शनिवारी दुपारच्या वेळी घरात आई आणि मुलगी यांच्यात वाद झाला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अंबिका ही पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी बहीण होती. तिने लहान भावंडांना मारहाण केल्याने आईने तिला विरोध केला. याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाच्या भरात आई कुमकुम हिचा राग अनावर झाला आणि तिने घरातील वरवंट्याने थेट अंबिकाच्या डोक्यात घातला . या हल्ल्यात अंबिकाचे डोके गंभीररीत्या ठेचले गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मीरा–भाईंदर वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ च्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.