पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली. भाजपचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी आपण खासदार नारायण राणे यांच्या आदेश स्वीकारले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनीष दळवी यांच्यासह आप्पा गावडे,विष्णू खानोलकर,ललितकुमार ठाकूर, जनार्दन कुडाळकर,ओंकार नाईक व नित्यानंद शेणई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान या ठिकाणी आता समिधा नाईक, उबाठाचे विजय नाईक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात लढत होणार आहे.

Comments
Add Comment

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी

पनवेल महापालिकेचा डंका, १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम

पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स

रत्नागिरी जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा

महायुतीची वर्चस्वासाठी तर महाविकास आघाडीची अस्तीत्वासाठी लढाई  नरेंद्र मोहिते रत्नागिरी : तब्बल आठ वर्षांनी