भोपाळ : देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'एम्स' (AIIMS) रुग्णालयातून सुरक्षेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात कार्यरत असलेल्या वर्षा सोनी या महिला कर्मचाऱ्याला लिफ्टमध्ये एका अज्ञात तरुणाने लुटल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्षा सोनी या रक्ताच्या पेढीमागील लिफ्टने जात असताना ही घटना घडली. लिफ्टमध्ये एकटाच असलेल्या आणि मास्क घातलेल्या एका तरुणाने संधी साधून वर्षा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचले आणि फरार झाला. ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. रुग्णालयासारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी भरदिवसा अशी घटना घडल्याने आरोग्य सेवा क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त खेळू जात आहे. "गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?" असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. एम्ससारख्या हाय-प्रोफाईल संस्थेत जर महिला कर्मचारी सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय, अशी चर्चा आता रंगली आहे.
क्षणार्धात गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले अन्...
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रुग्णालयात तुलनेने सुरक्षा व्यवस्था कमी होती, याचाच फायदा घेऊन एका सराईत चोरट्याने हा धाडसी गुन्हा केला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्याने महिला कर्मचाऱ्याला गाठले आणि संधी मिळताच लूट केली. वर्षा सोनी या लिफ्टने जात असताना आरोपीने लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्याने वर्षा यांना 'नेत्ररोग विभाग' कुठे आहे, अशी विचारणा करून संशय येणार नाही याची काळजी घेतली. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच, बाहेर पडण्याच्या बहाण्याने चोरट्याने अचानक वर्षा यांच्या गळ्यातील सोन्याची मोत्यांची माळ आणि मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. वर्षा यांनी हिंमतीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्याने त्यांना जोरात धक्का देऊन खाली पाडले आणि मंगळसूत्र घेऊन पसार झाला. हा सर्व प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यात चोरट्याची क्रूरता स्पष्टपणे दिसत आहे. घटनेच्या वेळी लिफ्ट परिसरात एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. बराच वेळ पीडित महिला तिथे रडत बसली होती. त्यानंतर एका गार्डने त्यांना पाहिले. बागसेवनिया पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात आलेला नाही, यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कोलकाता : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका सुक्या अन्नाचे ...
'BNS' कायद्यातील लवचिकतेमुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले?
भोपाळच्या 'एम्स' रुग्णालयातील लिफ्टमध्ये झालेल्या लुटीच्या घटनेने केवळ सुरक्षेचाच नाही, तर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील बदलांचा मुद्दाही ऐरणीवर आणला आहे. तज्ज्ञांच्या मते, कायद्यातील काही कलमांची तीव्रता कमी झाल्यामुळे गुन्हेगारांमधील पोलिसांचा आणि शिक्षेचा धाक ओसरला आहे की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. जुन्या कायद्यानुसार दरोडा, लूटमार किंवा चेन स्नॅचिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी १० ते १४ वर्षांच्या कडक कारावासाची तरतूद होती. मात्र, नवीन 'बीएनएस' कायद्यांतर्गत यातील काही गुन्ह्यांसाठी कमाल शिक्षेची मर्यादा केवळ ३ वर्षांपर्यंत खाली आली आहे. नव्या कायद्यात अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करणे अनिवार्य राहिलेले नाही. पोलीस आता आरोपींना केवळ नोटीस बजावून सोडू शकतात. अटकेची सक्ती नसल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षेची तीव्रता कमी झाल्याचा परिणाम थेट जमिनीवर दिसून येत आहे. गुन्हेगारांना तात्काळ जामीन मिळणे किंवा कमी शिक्षेची खात्री असल्याने सार्वजनिक ठिकाणी लूटमारीचे धाडस वाढले आहे.