मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान हक्काची सुट्टी मिळावी, असा आदेश देण्यास नकार दिला आहे.अशी तरतूद कायद्याने बंधनकारक केल्यास कंपन्या महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करतील, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच या निर्णयामुळे महिलांविषयीच्या लैंगिक रूढी अधिक बळकट होऊ शकतात, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.


मासिक पाळीमध्ये महिलांना हक्काची रजा मिळावी यासाठी नियम करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने ही गोष्ट सरकारच्या धोरणांशी जोडली गेली आहे, असे सांगितले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकारच्या याचिकांमुळे अनेकदा महिलांना कमी लेखले जाते. मासिक पाळी ही त्यांच्यासाठी काहीतरी नकारात्मक किंवा त्रासदायक गोष्ट आहे, असा संदेश यातून दिला जातो. हा महिलांचा अधिकार असू शकतो, पण त्याच वेळी कंपन्यांचाही विचार करणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मुख्य न्यायाधीशांनी मासिक पाळी रजा कायद्याद्वारे अनिवार्य केल्यास सामाजिक आणि व्यावसायिक परिणाम होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली. ‘स्वेच्छेने अशा प्रकारची रजा देणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, अशी रजा कायद्याने बंधनकारक केली तर कंपन्या महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करू शकतात. न्यायव्यवस्था किंवा सरकारी नोकऱ्यांमध्येही त्यांना संधी मिळणार नाही; त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो,’ असे ते म्हणाले.


मासिक पाळीसाठी हक्काच्या रजेची मागणी करणारी जनहित याचिका शैलेन्द्र मणि त्रिपाठी यांनी दाखल केली होती. त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील एम.आर. शमशाद यांनी न्यायालयात बाजू मांडली. काही राज्यांनी या दिशेने सकारात्मक पावले उचलली आहेत, असे सांगत संपूर्ण देशात मासिक पाळी रजा कायद्याने बंधनकारक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्य न्यायाधीशांनी ही रजा कायद्याने बंधनकारक केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे स्पष्ट केले. सध्या देशात मासिक पाळीदरम्यान, सुट्टीचा कोणता राष्ट्रीय कायदा नाही. काही ठिकाणी, संस्थांमध्ये आणि राज्यांनी आपापली धोरणे तयार केली आहेत.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत