इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा


नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात नुकसान होते. जीवितहानी होते, मालमत्तांचे नुकसान होते, आर्थिकदृष्ट्याही नुकसान होते. आताच्या घडीला अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मोठे युद्ध सुरू आहे. एकीकडे अमेरिका युद्ध जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला, तरी इराणकडून कारवाया सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून रान पेटले आहे. अशातच इराण युद्धामुळे अमेरिकेचा मोठा फायदा झाला, अशी कबुली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.


अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक विधान चर्चेत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढती किंमत अमेरिकेला आर्थिक फायदा देऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केल्याचे सांगितले जात आहे. संघर्ष, युद्ध आणि तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास व्यापार करत आहे. एक महिन्यापूर्वी हेच दर ७५ डॉलर प्रति बॅरल होते.


सोशल मीडियावर ट्रम्प म्हणाले की, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, म्हणून जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा अमेरिका अधिक कमाई करतो.

Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,