‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा
शब्दांवर साऱ्यांची मालकी
तीन अक्षरी शब्दांची ही
‘की’ची करामत बोलकी


दाराची बहीण कोण
तिला म्हणतात खिडकी
मातीची भांडी कसली?
ही तर आहेत मडकी


स्वतःभोवती फिरण्याला
घेतली म्हणतात गिरकी
कापसाच्या बीला येथे
सारेच म्हणतात सरकी


लावणीच्या ठसक्याला
घुंगरांच्या सोबत ढोलकी
झोप डोळ्यांवर आली की
जो तो घेतो डुलकी


ढोंगी मनुष्य दिसताच
आला म्हणतात नाटकी
एखाद्याची परिस्थितीसुद्धा
असते बरं फाटकी


नाकातला छोटा अलंकार
त्याला म्हणतात चमकी
छोट्याशा तालवाद्याला
म्हणतात खरं टिमकी


खेळात शब्दांची अशी
जेव्हा बसते अंगतपंगत
शब्दांशी होते मैत्री
खेळाला चढते रंगत.

Comments
Add Comment

भूकंप कसा होतो?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सहलीवर गेलेले शिवम व त्याचे मित्र आता परत निघाले होते. ते महादेवाच्या मंदिराची

दैव

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घराबाहेर पडताना आठवणीने आपण सर्व हातात बाळगतो ती

बाप्पा तोच, उत्सव नवा!

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर गणपती बाप्पा मोरया!” हा जयघोष कानावर पडला की मन आपोआप आनंदाने भरून येते.

छंद

कथा; रमेश तांबे विनय आणि त्याची बहीण विनया वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवत बसले होते. खरे तर ही दोन्ही भावंडे

या ध्वजाखाली या...

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर "या ध्वजाखाली या, सारे एकत्र या, भारतमातेच्या चरणी, कर्तव्याची शपथ

पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सारी मुले गप्पागोष्टींमध्ये रमत होती.“पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत?” अमोलने