Monday, January 26, 2026

‘की’ ची करामत

‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा शब्दांवर साऱ्यांची मालकी तीन अक्षरी शब्दांची ही ‘की’ची करामत बोलकी

दाराची बहीण कोण तिला म्हणतात खिडकी मातीची भांडी कसली? ही तर आहेत मडकी

स्वतःभोवती फिरण्याला घेतली म्हणतात गिरकी कापसाच्या बीला येथे सारेच म्हणतात सरकी

लावणीच्या ठसक्याला घुंगरांच्या सोबत ढोलकी झोप डोळ्यांवर आली की जो तो घेतो डुलकी

ढोंगी मनुष्य दिसताच आला म्हणतात नाटकी एखाद्याची परिस्थितीसुद्धा असते बरं फाटकी

नाकातला छोटा अलंकार त्याला म्हणतात चमकी छोट्याशा तालवाद्याला म्हणतात खरं टिमकी

खेळात शब्दांची अशी जेव्हा बसते अंगतपंगत शब्दांशी होते मैत्री खेळाला चढते रंगत.

Comments
Add Comment