तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले. गावाच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ (आयपीसी) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३(५) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११(१)(अ)(i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणामध्ये भटक्या कुत्र्यांना मारण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पेगाडपल्ली गावात ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले. राज्यातील विविध भागात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांची हत्या झाली आहे.