रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या मालिकेत २ - ० अशी आघाडी घेतली. भारताने नागपूरमध्ये झालेली पहिली टी २० मॅच ४८ धावांनी जिंकली होती.
रायपूरच्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने वीस षटकांत सहा बाद २०८ धावा केल्या तर भारताने १५.२ षटकांत तीन बाद २०९ धावा करुन मॅच जिंकली. टी २० मध्ये भारताने सहाव्यांदा २०० पेक्षा जास्त धावांचा आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये यशस्वी पाठलाग केला. रायपूरच्या मॅचमध्ये भारताने टी २० मधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. भारताकडून सूर्यकुमार यादवने नाबाद ८२ तर शिवम दुबेने नाबाद ३६ धावा केल्या. ईशान किशनने ७६ धावा केल्या. अभिषेक शर्मा शून्य धावांवर तर संजू सॅमसन सहा धावा करुन बाद झाला. गोलंदाजीत न्यूझीलंडकडून जेकब डफी, ईश सोधी आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
फलंदाजीत न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने १९, टिम सेफर्टने २४, रचिन रवींद्रने ४४, ग्लेन फिलिप्सने १९, डॅरिल मिशेलने १८, मार्क चॅपमनने १०, मिचेल सँटनरने नाबाद ४७, झकरी फौल्क्सने नाबाद १५ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने दोन तर शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणाने प्रत्येकी एक विकेट घेतली.