BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी १३१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हा सर्व पैसा खेळाडूंच्या खिशात जाणार नसून, त्यातील एक मोठा हिस्सा सरकारी तिजोरीत म्हणजेच 'इन्कम टॅक्स'च्या स्वरूपात जमा होणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट अमित कुमार यांच्या विश्लेषणानुसार, खेळाडूंच्या हातात येणारी प्रत्यक्ष रक्कम बरीच कमी असेल.



कराचे नियम काय सांगतात?



इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम 115BB नुसार, कोणत्याही बक्षीस किंवा पुरस्काराच्या रक्कमेला 'इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस' मानले जाते. या उत्पन्नावर थेट ३० टक्के टॅक्स लागतो. मोठ्या रकमेमुळे यावर १० टक्के ते ३७ टक्के सरचार्ज आणि ४ टक्के आरोग्य व शिक्षण उपकर लागतो. क्रिकेटपटूंच्या उच्च उत्पन्नाचा विचार करता, कराचा एकूण दर सुमारे ३६ टक्के ते ४० टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो.



बक्षीस रकमेचे अंदाजित गणित



एकूण बक्षिस - १३१ कोटी रुपये
टीडीएस (३० टक्के) - ३९.३ कोटी रुपये
सरचार्ज (अंदाजित १५ टक्के) - ५.८९५ कोटी रुपये
सेस (४ टक्के) - १.८३ कोटी रुपये
एकूण टॅक्स कपात- ४७ कोटी रुपये
खेळाडूंच्या हाती येणारी रक्कम - अंदाजे ८४ कोटी रुपये


CA अमित कुमार यांच्या मते, ही रक्कम देताना बीसीसीआय 'TDS' (Tax Deduction at Source) कापूनच खेळाडूंना पैसे देईल. खेळाडू त्यांच्या वार्षिक प्राप्तिकर विवरणपत्रात (ITR) काही सवलतींचा दावा करू शकतात, परंतु मोठ्या रकमेवर ३० टक्के टॅक्स अनिवार्य आहे.



BCCI सचिव देवजित सैकिया यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, भारतीय संघाने केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सिलेक्टर्स यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज आपण हा ऐतिहासिक टप्पा गाठू शकलो आहोत. भविष्यातही टीम इंडिया अशीच चमकदार कामगिरी करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Budapest Squash Open : वेलावन सेंथिलकुमारची फायनलमध्ये धडक; बुडापेस्ट स्क्वॉश ओपनमध्ये हंगेरीच्या स्टारशी रंगणार लढत

बुडापेस्ट : भारताचा स्टार स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमारने PSA बुडापेस्ट स्क्वॉश ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत

FIH Hockey World Cup : जर्मनीवर ३-१ असा दणदणीत विजय; भारतीय महिला हॉकी संघाची विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी

ॲमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने FIH महिला हॉकी विश्वचषक २०२६मध्ये शानदार कामगिरी करत पाचव्या स्थानावर

Neeraj Chopra : नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत मिळवले स्थान

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हंगामाची

Grand Chess Tour Final : प्रज्ञानानंदने रचला इतिहास, ग्रँड चेस टूर फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला

सेंट लुईस : भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने फॅबियानो करूआनाचा पराभव करत इतिहास रचला आहे.

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून