विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिरुवनंतपुरम येथे केले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतपुरम येथे पंतप्रधान मोदींनी पानूर ओव्हरब्रिजपासून पुथरिकंडम मैदानापर्यंत एक भव्य रोड शो केला. या दरम्यान त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. काही प्रकल्पांची पायाभरणी केली तसेच काही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच त्यांनी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचेही शुभारंभ केला आणि एक लाख लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जांचे वितरण केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की,विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे. विकसित भारताच्या निर्मितीत शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या ११ वर्षांपासून केंद्र सरकारने शहरी मूलभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की केंद्र सरकार शहरांतील गरीब कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात चार कोटींहून अधिक घरे बांधून ती गरीबांना देण्यात आली आहेत. यामध्ये शहरी गरीबांसाठी एक कोटींपेक्षा जास्त घरे उभारण्यात आली असून केरळमधील सव्वा लाख शहरी गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळाले आहे. ते पुढे म्हणाले की गरीब कुटुंबांचा वीजखर्च कमी व्हावा यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. गरीबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळत आहेत. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मातृ वंदना योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे केरळसह देशभरातील मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा लाभ झाला आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गेल्या ११ वर्षांत कोट्यवधी नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे मोठे काम करण्यात आले आहे. आता गरीब एससी, एसटी, ओबीसी, महिला तसेच मच्छीमारांनाही सहजपणे बँक कर्ज मिळत आहे. त्यांच्याकडे हमीदार नसला तरी सरकार स्वतः त्यांची हमीदार बनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान म्हणाले की रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळांत माल विकणाऱ्या रेहडी-पटरीवाल्यांची परिस्थिती पूर्वी अत्यंत बिकट होती. त्यांच्या सक्षमीकरणासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे देशभरातील लाखो रेहडी-पटरीवाल्यांना बँकांकडून मोठी मदत मिळाली असून अनेकांना आयुष्यात पहिल्यांदाच बँकेकडून कर्ज मिळाले आहे. आता केंद्र सरकार एक पाऊल पुढे टाकत या लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड देत आहे. काही वेळापूर्वी तिरुवनंतपुरम येथेही पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले. यामध्ये केरळमधील १० हजार आणि तिरुवनंतपुरममधील ६०० लाभार्थी आहेत. पूर्वी क्रेडिट कार्ड फक्त श्रीमंतांकडे असायचे, पण आता रेहडी-पटरीवाल्यांकडेही क्रेडिट कार्ड असल्याचे चित्र दिसत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.



आगामी निवडणुका केरळची दशा-दिशा बदलतील


सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ही केरळमधील दोन प्रमुख आघाड्या असून, भाजप आता तळागाळात तिसरा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले, "एलडीएफ आणि यूडीएफचे झेंडे वेगळे असले तरी त्यांचा अजेंडा एकच आहे - संपूर्ण भ्रष्टाचार आणि शून्य जबाबदारी. पूर्ण सांप्रदायिकता आणि कोणतीही उत्तरदायित्वाची भावना नाही. त्यांना माहिती आहे की पाच-दहा वर्षांनी पुन्हा सत्ता मिळेल. सरकार बदलते, पण व्यवस्था बदलत नाही. आता लोकांच्या हितासाठी आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारची गरज आहे. भाजप आणि एनडीए हे करून दाखवतील."

Comments
Add Comment

कर्नाटकात बाईक टॅक्सीला उच्च न्यायालयाकडून परवानगी

बंगळूरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली, तर बाईक टॅक्सी अॅग्रीगेटर्स,

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या