दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड गाठला आहे. रायगड जिल्ह्यातील 'पेण ग्रोथ सेंटर' (Raigad Pen Growth Centre) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमएमआरडीए (MMRDA) आणि जगातील विविध ११ अग्रगण्य कंपन्यांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत हे करार स्वाक्षरित करण्यात आले. 'तिसरी मुंबई' (Third Mumbai) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प तंत्रज्ञान, फिनटेक आणि डेटा सेंटर्सचे पुढील पिढीचे केंद्र ठरणार आहे.
गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारी 'शटल क्वीन' सायना नेहवाल हिने अखेर ...
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भारताचा पहिला समर्पित 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर' (GCC) जिल्हा उभारला जाणार आहे. यामध्ये दक्षिण कोरियाचा हनव्हा ग्रुप (Hanwha Group), अमेरिकेची फेडएक्स (FedEx), स्वित्झर्लंडची SSB SAUERWEIN आणि सिंगापूरचा मॅपल ट्री (Maple Tree) यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे रायगड जिल्हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा नवीन आर्थिक कणा म्हणून उदयास येणार आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक कंपन्यांना रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये गुंतवणूक करण्याचे खुले आवाहन केले. "हा प्रकल्प पुढील पिढीच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज आहे आणि जागतिक व्यवसायांसाठी हे एक सर्वोत्तम केंद्र ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या करारामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.