मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार राऊतांनी दिवास्वप्ने पाहू नयेत - भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मुंबईतील मतदारांनी महायुतीला भरभरून कौल देत उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनमताचा आदर राखत मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार आहे आणि महायुतीचा भगवा फडकणार आहे. ज्या दिवशी मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होईल तो दिवस मुंबईकरांसाठी सुवर्ण दिवस असणार आहे आणि उबाठा गटासाठी १६ जानेवारी हा निकालाचा दिवस काळा दिवस ठरला आहे अशी सणसणीत टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांनी कितीही मुंबईच्या महापौरपदाची दिवास्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत असा प्रहारही त्यांनी केला.


यावेळी बन म्हणाले की, कुठल्या पक्षाचा महापौर व्हावा हा महायुतीचा अजेंडा कधीच नव्हता. मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता उपभोगताना उबाठा गटाने मुंबईला लुटले होते. ती लूट थांबवून मुंबईचा विकास आणि मुंबईकरांचे जीवन सुकर आणि सुरक्षित करणे हे एकच ध्येय महायुतीचे आहे. भाजपा, शिवसेनेचे वरिष्ठ नेते चर्चेअंती लवकरच निर्णय घेतील तोपर्यंत राऊतांनी वायफळ बडबड करू नये. राऊत जी-जी स्वप्ने पाहतात ती कधीच पूर्ण होत नाहीत, अशी कोपरखळीही श्री. बन यांनी मारली. २९ पैकी २५ ठिकाणी भाजपा अव्वल ठरली आहे, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाचा आहे असेही त्यांनी नमूद केले.



मानखुर्दमधील विजय हा एका व्यक्तीचा नव्हे तर त्या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे.


मानखुर्द शिवाजीनगर मुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार पराभूत झाला होता हे जनतेला कळून चुकले होते. त्या पराभवाचा बदला घेण्याचे काम मतदारांनी यावेळी केले आणि विकासाला कौल देत भाजपाचा उमेदवार म्हणून मला निवडून दिले असे श्री. बन यांनी नमूद केले. मानखुर्दमध्ये मला मिळालेला विजय हा एका व्यक्तीचा नव्हे तर हा त्या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे.


राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकते. आज राऊतांना उपरती होऊन त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. खरे तर राऊतांच्या कौतुकपर शब्दांची देवेंद्रजींना गरजच नाही, कारण त्यांचे काम आणि विकास कामे यामुळेच मतदारांचा आशीर्वाद कायम मिळत आला आहे. पण तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याबद्दल भाजपाच्या संस्कारांनुसार आभार मानतो असा बन यांनी खोचक टोला लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भीतीपोटी नगरसेवकांना एकत्रित ठेवले नाही. भीती शिवसेनेला नाही तर उबाठा गट आणि राऊतांना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त नगरसेवकांचा एकमेकांशी परिचय व्हावा या उद्देशाने नगरसेवकांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यावरून राऊतांनी उगाच खयाली पुलाव शिजवू नये. नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यामुळे कुठे वेगळी आघाडी जन्माला येईल, नवे समीकरण तयार होईल अशा हाकाट्या पिटू नयेत असा टोला बन यांनी लगावला.



महाराष्ट्रात बिहार भवन होणार असेल तर त्यात गैर काय आहे


महाराष्ट्रात बिहार भवन होणार असेल तर त्यात गैर काय आहे, असा सवाल करत बन म्हणाले बिहारमध्ये देखील महाराष्ट्र भवन आहे. ठिकठिकाणी महाराष्ट्र भवने आहेत बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय व्हावी या हेतूने ही भवने वेगवेगळ्या राज्यात उभारली जातात. या विषयावरून मनसे विनाकारण प्रांतवाद उकरून काढत आहे. अशा पद्धतीचा प्रांतवाद, भाषावाद केल्यामुळे मनसे पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार राज ठाकरे यांनी करावा असा टोला बन यांनी लगावला.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच