खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. याचदरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.


क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं आहे. शीतल म्हात्रेंच्या या आरोपामुळे शिवसेना ठाकरे गट कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात याच्या शिवनिका संस्थेसाठी ३९ लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते, ज्याचा जीआर (GR) नुकताच समोर आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या संस्थानला पाणी पुरवण्यासाठी धरणापासून ४८ किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले असले तरी, त्याचा वापर खरातच्या २१ एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रस्ताव २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. त्यावेळी जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते.





अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी


अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात १० वा गुन्हा दाखल झाला आहे.



अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे


अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. १५ ऑक्टोबर २०१२ रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. १ जानेवारी २०२४ रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी ५ काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.