भाजपच्या योगिता कोळींच्या विजयाची चर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मतमोजणीदरम्यान अवघ्या दोन तासांतच उबाठा गटाच्या हातून सत्ता जाणार हे स्पष्ट झाले. भाजप व शिवसेना महायुती सत्तासंपादनाकडे इतरांच्या मदतीने वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर मुंबईत ठिकठिकाणी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कोठे गुलाल उधळला जात होता, तर कुठे फटाक्यांनी आसमंत दणाणून गेला होता. या निवडणुकीमध्ये माजी महापौर सुनील प्रभू, विश्वनाथ महाडेश्वर आणि चंद्रकांत हंडोरे यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात होते. यापैंकी सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित, विश्वनाथ महाडेश्वर यांची पत्नी पुजा आणि चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती यांचा विजय झाला आहे. महापौरांचे नातेवाईक असलेल्या तिन्ही उमेदवारांनी आपले गड राखत आपला विजय प्राप्त केला. मुंबई महानगरपालिकेत प्रथमच भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे ८२ नगरसेवक विजयी झाले होते व भाजपने सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा दिला होता.
सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले नगरसेवक कोण
भाजप, योगिता कोळी, प्रभाग क्रमांक ४६, मताधिक्य २१,७१७
भाजप, तेजिंदर तिवाना, प्रभाग क्रमांक ४७, मताधिक्य १३, ५५८
शिवसेना, दीक्षा कारकर, प्रभाग क्रमांक ६, मताधिक्य १२,४५८
भाजप, जितेंद्र पटेल, प्रभाग क्रमांक १०, मताधिक्य : १२,२४९
भाजप तेजस्वी घोसाळकर, प्रभाग क्रमांक ३, मताधिक्य १०, ७५५
भाजप, राणी द्विवेदी, प्रभाग क्रमांक १३, मताधिक्य : १०,४०२
भाजप, योगेश वर्मा, प्रभाग क्रमांक ३५, मताधिक्य : १०,०५६
भाजपच्या योगिता कोळी सर्वाधिक २१ हजार मतांनी विजयी
मालाड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ४६मधून भाजपच्या योगिता कोळी यांनी तब्बल २१ हजार मताधिक्यानी विजय मिळवला आहे. कोळी यांना ३७ हजार एवढे मतदान झाले आहे, मनसेच्या स्नेहलिता डेहलीकर यांना १६ हजार मते मिळाली अहे. त्यामुळे योगिता कोळी २१ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या असून मुंबईतील सर्वात जास्त मताधिक्य असलेले मिळवणाऱ्या नगरसेविका ठरल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे प्रवीण शाह हे सर्वाधिक १५ हजारांच्या मताधिक्यांने मतांनी विजयी झाले होते.