राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहुमत मिळवले आहे. यात मुंबई मनपाची देशभरात चर्चा सुरू होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळेच, उद्धवसेना आणि मनसे किती जागा जिंकणार, याकडेच सर्व राज्याचे लक्ष लागून होते. मुंबई मनपात प्रथमच भाजपला बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. आपल्या राजकारणात नेहमी मराठी आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचे, असा मुद्दा मांडणाऱ्या मनसेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राज्यातील २२ शहरांत मनसेला एकही जागा मिळालेली नाही. पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली-मिरज, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, नागपूर, परभणी, जालना, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर येथे मनसेचा खातेही उघडलेले नाही.


शहरनिहाय मनसेची स्थिती
मुंबई : ५
कल्याण-डोंबिवली : ४
ठाणे : १
नाशिक : २
नवी मुंबई : १
अहिल्यानगर : ३
उल्हासनगर : १

Comments
Add Comment

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५