मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ नंतर बंद पडला. जगभरातील अनेक ठिकाणांहून एक्स (X) अर्थात ट्विटर (Twitter) बंद पडल्याच्या तक्रारी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत. एक्स (X) अर्थात ट्विटरचे (Twitter) ग्रोक (Grok) हे एआय बॉट पण बंद आहे. तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
एक्स (X) अर्थात ट्विटरवर (Twitter) नव्याने कोणतीही पोस्ट होत नाही तसेच अनेक जुन्या पोस्ट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक वापरकर्त्यांनी अर्थात युझरनी केल्या आहेत. या समस्या वेबसाईटवर तसेच अॅपद्वारे एक्स (X) अर्थात ट्विटर (Twitter) वापरणाऱ्या लक्षावधी वापरकर्त्यांनी अर्थात युझरनी केली आहे. तंत्रज्ञ समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.