प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार


विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपली असून, उमेदवारांनी आता खाजगी रीत्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम, कर्मचारी प्रशिक्षण, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.


वसई विरार महानगरपालिका हद्दीत ११५ जागांसाठी उद्या ( गुरुवारी ) मतदान होणार आहे. यासाठी एकूण ५४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ११ लाख २६ हजार ४०० मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण १ हजार ३३५ मतदार केंद्र तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी एकूण ८ हजार १० कर्मचारी तैनात करण्यात आले असून या सर्वांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. तसेच ३१७ ठिकाणी दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त निवडणुकीकरिता ९ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ९० केंद्र निहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. तसेच प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली असून वसई विरार मधील मतदारांनी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


७० टक्के मतदारांना स्लिप पोहचल्या :


वसई - विरार महानगरपालिका हद्दीतील उमेद्वारांसाठी शहराबाहेर राहणाऱ्या मतदारांकडून टपाली मतदान करण्यात आले आहे. एकूण ९३२ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. तसेच यासह उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदारांपर्यंत मतदान स्लिप पोचविण्याचे काम देखील सुरु असून ते ७० टक्के पूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली. तसेच मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती हवी असल्यास पालिकेच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती उपलब्ध असल्याची माहिती पालिकेने दिली. यासह मतदान करताना मतदारांनी ४ मत एका वेळी देणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या मतदाराने केवळ एकाच उमेदवाराला मत दिल्यानंतर इतर तिघांना मत देण्यास नकार दिल्यास उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने नोटावर मत देण्यात येणार असल्याचिं माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील

पालघर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र पाटील

तीन स्वीकृत सदस्यांचीही निवड पालघर :पालघर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष सभेत