सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात


पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून डाव्या तीर मुख्य कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा ३० डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत त्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या तीर मुख्य कालव्याच्या पहिल्या टप्प्यातील १ ते ७ किलोमीटर अंतराचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. या दुरुस्तीमुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहाला लक्षणीय गती मिळाली असून सध्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचणे शक्य झाले आहे. परिणामी डहाणू व पालघर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.



दरम्यान, उजव्या तीर कालव्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती व अस्तरीकरणाच्या कामामुळे सध्या त्या कालव्यातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. हे काम पूर्ण होताच दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.डाव्या तीर मुख्य कालव्याची एकूण लांबी सुमारे २९ किलोमीटर असून त्यापैकी पहिल्या ७ किलोमीटरचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. तसेच उजव्या तीर कालव्याची एकूण लांबी ३३ किलोमीटर असून या कालव्याच्या देखील पहिल्या १ ते ७ किलोमीटर टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्प्यांसाठी आवश्यक काम प्रस्तावित असून ते पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
मुख्य कालव्यावरून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या लघु कालव्यांची दुरुस्ती, गाळ काढणे आणि पाणी वहन क्षमता वाढविण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीमुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास शेती उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Vasai - Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर

Viral Video : सफाळेत एसटी चालकाने युनिफॉर्म काढून थोपटले दंड; प्रवाशाला दिलं खुलं आव्हान, बस डेपोत जोरदार राडा

पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित