Vasai - Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले असून, अवघ्या १५ दिवसांत सहा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग वरील विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.



कचऱ्याजवळ सडलेल्या अवस्थेत मृतदेह


स्थानिकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक मृतदेह दिसून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपात, याचा तपास सुरू आहे.



१५ दिवसांत सहा मृतदेह


गेल्या दोन आठवड्यांत या परिसरात सापडलेल्या मृतदेहांची मालिका चिंताजनक आहे.


२१ मार्च : शिरवली येथे महिलेचा कुजलेला मृतदेह; पती अटकेत
२३-२४ मार्च : धानिवबाग येथे ६ वर्षीय बालिकेचा विहिरीत मृतदेह
२६-२७ मार्च : पेल्हार फाटा येथे शिरच्छेद अवस्थेत पुरुषाचा मृतदेह
मार्च अखेर : नालासोपारा पश्चिम येथे नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह
३०-३१ मार्च : फुलपाडा येथे अज्ञात इसमाचा मृतदेह
५ एप्रिल : विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह



नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


सतत उघड होत असलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. निर्जन भाग, अपुरी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव यामुळे गुन्हेगारांना वाव मिळत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.



पोलिसांसमोर तपासाचे आव्हान


काही प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अनेक मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही आव्हानात्मक ठरत आहे. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा आधार घेत तपास सुरू असून, या घटनांमागील सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


वसई–विरार पट्ट्यात सलग सापडणारे मृतदेह ही गंभीर बाब ठरत असून, या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना आणि देखरेख वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे