Viral Video : सफाळेत एसटी चालकाने युनिफॉर्म काढून थोपटले दंड; प्रवाशाला दिलं खुलं आव्हान, बस डेपोत जोरदार राडा

पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशासोबत झालेल्या वादाचे पर्यवसान इतक्या टोकाच्या संतापात झाले की, संतापलेल्या चालकाने अंगावरील खाकी युनिफॉर्म काढून थेट आगारातच त्या प्रवाशाविरोधात दंड थोपटले. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद पाहता-पाहता विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात असलेल्या चालकाने आपल्या पदाची आणि गणवेशाची पर्वा न करता प्रवाशाला भिडण्याचे आव्हान दिले. हा सर्व राडा सुरू असताना बस स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, 'लाल परी'च्या चालकाच्या या वर्तणुकीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रतिमेला या घटनेमुळे धक्का बसला आहे.





पालघर जिल्ह्यातील सफाळे बस आगारात एसटी चालकाच्या दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस उशिरा आल्याचा रास्त जाब विचारणाऱ्या एका प्रवाशावर बस चालक अश्वजीत कांबळे याने चक्क अंगावरील युनिफॉर्म काढून धावून जाण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक घटनेमुळे एसटी महामंडळाच्या शिस्तीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित वेळेपेक्षा बस उशिरा आल्याने प्रवाशाने चालकाला विचारणा केली होती. मात्र, आपल्या चुकीची कबुली देण्याऐवजी चालक अश्वजीत कांबळे याचा पारा चढला. संतापाच्या भरात त्याने भर आगारात आपला सरकारी युनिफॉर्म उतरवला आणि दंड थोपटून प्रवाशाला "खाली उतर, तुला बघतोच" असे खुले आव्हान दिले. यावेळी चालकाने अत्यंत अश्लील शिवीगाळ करत प्रवाशाला दमदाटी केल्याचा आरोपही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. आगारात प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही या चालकाची मुजोरी सुरूच होती. तिथे उपस्थित असलेल्या काही सुज्ञ प्रवाशांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, प्रवाशांशी अशा प्रकारे उद्धट वर्तन करणाऱ्या आणि वर्दीचा अपमान करणाऱ्या या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालघरमधील नागरिकांकडून केली जात आहे.


बसला उशीर झाल्याने प्रवाशांनी विचारणा केली असता, चालक अश्वजीत कांबळे याने चक्क आपला युनिफॉर्म उतरवून बाजूला ठेवला आणि भर आगारात प्रवाशाच्या अंगावर धावून जात दंड थोपटले. "खाली उतर, तुला बघतोच," असे म्हणत त्याने प्रवाशाला धमकावले. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर आहे, त्याच चालकाचा हा उद्दामपणा पाहून उपस्थित बघेही अवाक झाले. या संपूर्ण राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, नेटिझन्सकडून या 'उर्मट' चालकावर कडक कारवाईची मागणी होत आहे. एसटी महामंडळाच्या शिस्तीला हरताळ फासणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अश्वजीत कांबळे या चालकाला रोखण्यासाठी त्याचे सहकारी ही पुढे सरसावले होते. पण ते त्यांचे ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. व्हिडीओमध्ये हे सर्व स्पष्ट दिसत आहे. एकाने रोखलं तर दुसरा त्यांना रोखत होता. पण त्यांना ही ढकलून कांबळे पुढे जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणती ही तक्रार दाखल झालेली नाही. किंवा कांबळे यांच्यावर ही कोणत्या कारवाईचे संकेत देण्यात आलेले नाहीत. मात्र या व्हिडीओची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

West Bengal : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला