प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे


 विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना करण्याच्या विषय शुक्रवारी घेण्यात आलेल्या महासभेत चांगलाच गाजला. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने नियमांचे "गणित" मांडून नऊपैकी आठ प्रभाग समित्यांवर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. तर सदस्य संख्या किंवा जुन्या प्रभाग रचनेनुसार किमान तीन प्रभाग समित्याची अपेक्षा करणाऱ्या भाजपला केवळ एका प्रभाग समितीवर समाधान मानावे लागणार आहे. भाजपच्या ४३ सदस्यांनी या विषयाला विरोध केला असताना, बहुजन विकास आघाडीच्या ७० नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करून या विषयाला मंजुरी दिली आहे.


वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर बहुजन विकास आघाडी सत्तेत आली आहे. असे असले तरी विरोधकांकडे असलेली ४४ सदस्य संख्या ही बहुजन विकास आघाडीला खटकणारी अशीच आहे. विरार पश्चिमेकडील भाग हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या भागातील प्रभाग क्रमांक दोन आणि पाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे जुन्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग ए समितीवर भाजपचा सभापती बसण्याचे संकेत होते. तसेच प्रभाग बी आणि डी या प्रभागांमध्ये सुद्धा नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे वर्चस्व आहे.


परिणामी स्थायी समिती सभापती निवडीच्या पूर्वी प्रभागांची रचना आपल्या सोयीनुसार करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने बऱ्याच दिवसापासून विशेष तयारी चालविली होती. कायदा आणि नियमाच्या आधारे नागरिकांच्या सोयीने जवळ जवळ असणारे प्रभाग एकत्रित करून नवी प्रभाग रचना करण्यात आल्याचा प्रस्ताव सभागृह नेते प्रफुल साने यांनी सभेत मांडला. स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. तर विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि गटनेते अशोक शेळके यांनी या विषयाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यामुळे या विषयासाठी आवाजी मतदान घेण्यात आले. आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला. परिणामी बविआचे आठ प्रभाग समिती सभापती राहणार हे स्पष्ट आहे.



प्रभाग समिती ई सभापती पदासाठी तीन नावे चर्चेत


प्रभाग समितीच्या रचनेला भाजपने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या विषयावरून भाजप न्यायालयात हाक देण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला देखील एक सभापती पद मिळणार असल्याने प्रभाग समिती इ. च्या सभापती पदासाठी भाजपकडून तीन नावे चर्चेत आले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, प्रभाग क्रमांक १६ चे नीलेश चौधरी आणि प्रभाग क्रमांक १७ मधील जयप्रकाश वझे यांची नावे प्रभाग समिती ई सभापती पदासाठी पुढे आली आहेत.



नव्या प्रभाग रचनेनुसार असे राहील संख्यबळ


नव्या प्रभाग समित्याप्रभाग ए - बविआ ८ - भाजप ४
प्रभाग बी - बविआ ८- भाजप ४
प्रभाग सी - बविआ ८- भाजप ४
प्रभाग डी - बविआ ९ - भाजप ७
प्रभाग ई - बविआ ४- भाजप १२
प्रभाग एफ -बविआ ७ - भाजप ५
प्रभाग जी -बविआ ८- भाजप ४
प्रभाग एच - बविआ ८- भाजप ४
प्रभाग आय - बविआ - ११



नव्या प्रभाग समित्या


प्रभाग ए - प्रभाग क्रमांक - १, २,आणि ३
प्रभाग बी - प्रभाग क्रमांक -४, ५ आणि १२
प्रभाग सी -प्रभाग क्रमांक - ११, १३ आणि १४
प्रभाग डी - प्रभाग क्रमांक -६, ७, ८ आणि १०
प्रभाग ई - प्रभाग क्रमांक -९, ५, १६ आणि १७
प्रभाग एफ - प्रभाग क्रमांक -१८, १९ आणि २१
प्रभाग जी - प्रभाग क्रमांक -२०, २२ आणि २७
प्रभाग एच - प्रभाग क्रमांक - २३, २४ आणि २६


प्रभाग आय - प्रभाग आय -२५, २८ आणि २९

Comments
Add Comment

Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Palghar Gang Rape : धक्कादायक! पालघरमध्ये तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू

Palghar Gang Rape : पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape)

Jawharla Earthquake : पालघर जिल्हा हादरला! जव्हारला भूकंपाचे सलग धक्के! ४ वेळा हादरली जमीन

- नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली जागून काढली रात्र पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराला सोमवारी रात्री

Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना

पालघर : वसईतील नायगाव (Vasai Accident) परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून पडल्याने एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू