पालघर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र पाटील

तीन स्वीकृत सदस्यांचीही निवड


पालघर :पालघर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष सभेत राजेंद्र आत्माराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या ॲड. धर्मेंद्र भट्ट व रवींद्र म्हात्रे यांची तर भाजपकडून जयेश आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. पालघर नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे) गटाचे १९ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे ८, तर उबाठा गटाचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम घरत निवडून आले आहेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे) पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून चंद्रशेखर वडे व राजेंद्र पाटील यांची नावे चर्चेत होती.


राजेंद्र पाटील यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवक संख्येनुसार या पक्षाकडून दोन स्वीकृत सदस्यांची शिफारस करण्यात आली. यापूर्वी स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या ॲड. धर्मेंद्र भट्ट यांनी यावेळीही स्वीकृत सदस्यांसाठी अर्ज भरला. माजी नगरसेवक रवींद्र (बंड्या) म्हात्रे यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे पक्षाने त्यांना संधी देत स्वीकृत सदस्य पदासाठी संधी दिली. शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका दीपा पामाळे व युवासेनेचे अमेय पाटील यांनी देखील स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज केला होता. गट नेत्यांकडून देण्यात आलेल्या पत्रात ॲड. धर्मेंद्र भट्ट व रवींद्र म्हात्रे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे सभेचे पीठासीन अधिकारी असणाऱ्या नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी भट्ट आणि म्हात्रे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच भाजपचे गटनेते भावानंद संखे यांनी जयेश आव्हाड यांच्या नावाची शिफारस केल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी आव्हाड यांची स्वीकृत सदस्य पदी निवड केली.

Comments
Add Comment

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील

वसई-विरार महापालिकेमध्ये २९ हजार दुबार मतदार बे‘पत्ता’

दुबार मतदान करणार नसल्याचे पाच हजार मतदारांकडून हमीपत्र विरार :वसई - विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या ५२ हजार

दांडी गावात मुले पळवण्याच्या संशयावरून खळबळ

संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात बोईसर : पालघर तालुक्यातील दांडी गावात मुले पळवणारी टोळी आल्याच्या

आंबेडकर चौक ते नीलसृष्टी मार्ग महिनाभर बंद

पालघर : पालघर शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या आंबेडकर चौक ते नीलसृष्टी अपार्टमेंट दरम्यान सिमेंट

Metro News: दहिसर मेट्रो स्थानकावर मुंबईतील पहिला ‘पेड एरिया इंटरचेंज’; मिरा रोड–अंधेरी थेट प्रवास शक्य

मुंबई :मुंबईकराचं मेट्रो प्रवास अधिक सुखदायी होणार आहे. मुंबईतील मेट्रो सेवेचा विस्तार वेगाने सुरू असून