मोहित सोमण: सीबीडीटी (Central Board of Direct taxes CBDT) या केंद्रीय कर विभागाने ११ जानेवारीपर्यंत कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार ११ जानेवारीपर्यंत गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या एकूण कर संकलनात (Net Tax Collection) इयर ऑन इयर बेसिसवर ८.८२% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी जानेवारीच्या १६८८९०९.६७ कोटी तुलनेत या जानेवारीत १८३७८९८.३१ कोटींवर वाढ झाली आहे. कर संकलनात कॉर्पोरेशन कर संकलनातही इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या जानेवारीतील ७६७७४०.०२ कोटी रुपये तुलनेत या जानेवारीत (११ जानेवारीपर्यंत) ८६३०३८.८८ कोटीवर वाढ झाली आहे. विना कॉर्पोरेट (NCT) कर संकलनात १७१२८१.३४ कोटी तुलनेत या जानेवारीत १२८३६४.४४ कोटींवर घसरण झाली आहे. गेल्या महिन्यातील विना कॉर्पोरेट संकलनातील घसरणीचा ट्रेंड यंदाही कायम राहिला आहे. एसटीटीत इयर ऑन इयर बेसिसवर कुठलाही बदल झाला नसून इतर करात (Other Tax OT) गेल्या जानेवारीतील ४८.८८ कोटी तुलनेत २३.७३ कोटींवर घसरण झाली आहे. मात्र यंदा उपलब्ध माहितीनुसार, एकूण कर परताव्यात (Tax Refunds) इयर ऑन इयर बेसिसवर १६.९२% घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या ३७५४४१.२७ कोटी रुपये तुलनेत या जानेवारीत ३११९३३.५७ कोटीवर घसरण झाली आहे.
माहितीनुसार स्थूल कर संकलनात (Gross Tax Collection) इयर ऑन इयर बेसिसवर यंदा ४.१४ वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या २०६४३५०.९४ कोटी तुलनेत या वर्षी २१४९८३१.८९ कोटीवर वाढ नोंदवली आहे. येत्या १ फेब्रुवारीला भारतात अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. कर संकलनात गेल्या महिन्यातही वाढ नोंदवली असून वैयक्तिक करापेक्षा कॉर्पोरेट करात वाढ झाली होती जी यंदाही कायम आहे. तर वैयक्तिक करातही वाढ झाली आहे.