Bharat Coking Coal IPO: अखेरीस कंपनीच्या आयपीओला तुंबळ प्रतिसाद १४१.९० पटीने सबस्क्रिप्शनसह आयपीओ समाप्त!

मोहित सोमण: भारत कोकिंग कोल या कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या आयपीओला आज अखेरच्या टप्प्यापर्यंत जबरदस्त सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तिसऱ्या अंतिम दिवशी आयपीओला एकूण १४१.९० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे हा पब्लिक इशू यशस्वी झाला असून मोठा प्रतिसाद गुंतवणूकदारांना दिल्याचे यातून स्पष्ट होते. आकडेवारीनुसार पब्लिक इशूपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून एकूण ४७.५५ पटीने तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून तब्बल ३०६.१८ पटीने, व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २३९.४६ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या एकूण आयपीओतील सबस्क्रिप्शपैकी श्रेणीसह पाहिल्यास पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून उपलब्ध ७९१६९००० शेअरसाठी २४३१९४२२०० इतके सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर रिटेल गुंतवणूकदारांकडून ५९३७६७५० शेअरसाठी १४२१८३३७४०० इतके सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून २३२८५००० शेअरसाठी ११६०३४६०० शेअरचे सबस्क्रिप्शन मिळाले आहे. आयपीओआधी कंपनीने २७३.१३ कोटीचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केला होता. १०७१.११ कोटी रुपये मूल्यांकन असलेल्या आयपीओत ४६.५७ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी ठेवण्यात आल्याने कुठलाही नवा फ्रेश इशू बाजारात नव्हता. ९ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत या आयपीओचे सबस्क्रिप्शन गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करण्यात आले होते.


१४ जानेवारी म्हणजेच उद्या पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी २३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता तर हा शेअर बीएसई व एनएसईवर १६ जानेवारीला सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीचे सध्याचे बाजार १०७११.१० कोटी रुपये आहे. कंपनीचे शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ३३ रूपये प्रति शेअर सांगितली जात आहे. मूळ २३ रूपये प्राईज बँड किंमतीपेक्षा १० रूपये प्रति शेअर प्रिमियम दरावर हा शेअर सूचीबद्ध होईल असे आयपीओतील वर्तृळातून सांगितले जात आहे. भारत कोकिंग कोल ही कोळसा व तत्सम कोकिंग कोल निर्मिती करणारी कंपनी असून कोल इंडिया कंपनीची उपकंपनी (Subsidiary) आहे.


आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कोकिंग कोळशाची मागणी ६७ दशलक्ष मेट्रिक टन (MT) राहण्याचा अंदाज आहे आणि आर्थिक वर्ष २०३५ पर्यंत ती १३८ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, जी ७.५% वार्षिक चक्रवाढ वाढ दर्शवते. ही वाढ भारताची पोलाद उत्पादन क्षमता वार्षिक सुमारे ३०० दशलक्ष टनांपर्यंत विस्तारल्यामुळे होत आहे. भारताचे देशांतर्गत कोळसा उत्पादन एकूण मागणीपेक्षा कमी पडत आहे ज्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी आयात करणे आवश्यक ठरते. हा देश जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा आयातदार आहे, जो जागतिक नॉन-कोकिंग कोळसा आयातीपैकी जवळपास १८ टक्के वाटा उचलतो. २०२५ मध्ये भारताने आपल्या ऊर्जा आणि औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे २४४ दशलक्ष टन कोळसा आयात केला.

Comments
Add Comment

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि

४ दशकांची प्रतीक्षा संपणार; कोल्हापूर–कोकण रेल्वेने जोडले जाणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा मार्ग

बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; ४०० हून अधिक बांधकामे हटवणार

बदलापूर : नगरपालिका निवडणुकांनंतर बदलापूर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, अनधिकृत बांधकामांविरोधात

प्रशासनात खांदेपालट, ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व

अजित पवार यांचे मंत्रालयातील दालन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे कायम

मुंबई : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालने कायम