BMC : स्थानिक समस्यांबाबत लोकप्रतिनिधींशी संवाद ठेवा

मुंबई विशेष प्रतिनिधी : जनतेच्या समस्या आणि स्थानिक स्तरावरील वस्तुस्थिती योग्यप्रकारे समोर आणण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. त्यामुळे, प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवून त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नाल्यांतून गाळ काढणे, स्वच्छता किंवा अन्य संबंधित कामकाजांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती देत राहावी. स्थानिक नगरसेवकांकडून आलेल्या सूचना, प्रतिक्रियांचे पालन होईल, यासाठी सहायक आयुक्त यांनी प्रयत्न करावेत,अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले.




[caption id="attachment_1017441" align="alignnone" width="650"]BMC-commissioner-Ashwini-Bhide-in-meeting BMC-commissioner-Ashwini-Bhide-in-meeting[/caption]

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी ११ एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित केली होती. यावेळी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी हे निर्देश दिले आहे. यावेळी बोलतांना भिडे यांनी विविध समस्यांबाबत नगरसेवकांनी सभागृहात केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देशित केले की, जनतेच्या समस्या आणि स्थानिक स्तरावरील वस्तुस्थिती योग्यप्रकारे समोर आणण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. त्यामुळे, प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवून त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नाल्यांतून गाळ काढणे, स्वच्छता किंवा अन्य संबंधित कामकाजांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती देत राहावी. स्थानिक नगरसेवकांकडून आलेल्या सूचना, प्रतिक्रियांचे पालन होईल, यासाठी सहायक आयुक्त यांनी प्रयत्न करावेत. सातत्यपूर्ण संवाद आणि त्यात पारदर्शकता ठेवल्यास आपापसांतील समन्वय प्रभावी होतो. प्रशासनाने स्वत:हून सक्रियपणे आणि वस्तुनिष्ठपणे सातत्याने माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे कोविडमध्ये आपण यशस्वी ठरू शकलो. आताही त्याच सक्रियतेने काम करावे, असे आवाहनही भिडे यांनी यावेळी केले.


मुंबई महानगरपालिकेने मुंबईत अनेक मोठे प्रकल्प, विकासकामे हाती घेतली आहेत. यामध्ये विविध प्राधिकरणाच्या यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणांशी योग्य समन्वय राहावा. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि अन्य यंत्रणांमध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा. तसेच, वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण बाबींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्यात एका शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले. तसेच, आढावा बैठकीत केलेल्या चर्चेनुसार संबंधीत कार्यपूर्तीचा अहवालही या बैठकीत घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका ही नागरी सेवासुविधा पुरविण्याचे काम करते. मात्र, आता त्यापुढे जाऊन आपल्याला काम करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह यांच्यासह सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी या बैठकीस उपस्थित होते.

Comments
Add Comment

Zeeshan Siddique : ‘तुला जिवंत सोडणार नाही’; NCP नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण