वसई-विरार महापालिकेमध्ये २९ हजार दुबार मतदार बे‘पत्ता’

दुबार मतदान करणार नसल्याचे पाच हजार मतदारांकडून हमीपत्र


विरार :वसई - विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या ५२ हजार दुबार मतदारांपैकी तब्बल २९ हजार १२७ मतदारांच्या रहिवासाचा पत्ता महापालिकेच्या पथकांना सापडला नाही. तर २३ हजार २५२ मतदारांचा शोध घेण्यात आला आहे. ५ हजार १५८ मतदारांकडून दुबार मतदान करण्यात येणार नाही अशा बाबतचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. उर्वरित मतदारांकडून मतदानाच्या दिवशीच हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. दुबार मतदारांबाबत संपूर्ण राज्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा या बाबीला गंभीरतेने घेतले आहे. मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या प्रत्येक मतदारांच्या नावासमोर दोन स्टार देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दुबार मतदारांचा शोध घेऊन, कोणत्याही एकाच मतदान केंद्रावर मतदान करणार अशा प्रकारचे हमी पत्र लिहून घेण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे आता अशा प्रकारचे हमीपत्र दुबार नावे असलेल्या मतदारांकडून लिहून घेण्यात आले नसल्यास, मतदानाच्या दिवशी सुद्धा ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहीत धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार पालिका हद्दीत ११ लाख २६ हजार ४०० मतदारांची नोंद आहे. यामध्ये ५२ हजार ३७९ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली होती. त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती.


दुबार मतदारांपैकी पालिकेला २३ हजार २५२ मतदारांचा पत्ता शोधण्यात यश आले. मात्र त्यापैकी केवळ ५ हजार १५८ मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. मात्र या सर्व दुबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. संबंधित केंद्रावर मतदान करण्यास आलेल्या दुबार मतदारांकडून त्याचवेळी मतदान केल्यानंतर हमीपत्र लिहून घेण्यात असल्याचे पालिकेने सांगितले.

Comments
Add Comment

डिसेंबर महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक महागाईत किरकोळ वाढ 'ही' आहे आकडेवारी

मोहित सोमण: केंद्र सरकारच्या नव्या आकडेवारीनुसार यंदाच्या ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) महागाईत इयर ऑन इयर

Meta Layoff: मेटाकडून 'या' विभागात १०% कर्मचारी कपात जाहीर १५०० जणांना नारळ मिळणार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सेंटर प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने मेटा (Meta) कंपनीने १५०० कर्मचाऱ्यांना नारळ

उबाठाची मते विकत घेण्याची धडपड, वरळीत केले पैसेवाटप

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी मतदान होणार आहे. प्रचाराला अवघे काही तास उरले आहेत. या परिस्थितीत

भारत विकासाच्या सुवर्णयुगात घसरती महागाई व वाढता विकास दर परंतु...

HSBC Global Investment Research रिपोर्ट- मुंबई: एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेसमेंट रिसर्च संस्थेने भारतीय कालखंड आर्थिक सुवर्णकाळातून

Gold Silver Rate Update:सोन्याचांदीत सलग तिसऱ्यांदा विक्रमी वाढ! सोने १४२००० व चांदी २७५००० पार....

मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आजही तुफान वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा ही वाढ झाली असून इराण व युएस यांच्यातील

एचसीएल टेक्नॉलॉजीच्या निव्वळ नफ्यात ११% घसरण तरीही निकाल मजबूत कंपनीकडून १२ रूपये लाभांश जाहीर

मोहित सोमण: एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड (HCL Technologies Limited) या आयटी कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. एक्सचेंज