'अजित पवारांच्या विमान अपघातावरून राऊत, रोहित पवारांची स्टंटबाजी'

- भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रखर टीका


अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार रोज उठून तेचतेच मुद्दे मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. मात्र सत्य समोर आणतोय असा आव आणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि रोहित पवार करत आहेत असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) केला.


भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि डीजीसीए स्तरावर अपघाताची चौकशी सुरूच आहे, सीबीआय चौकशीच्या केलेल्या मागणीवर देखील सकारात्मकरित्या विचार सुरू आहे, असेही नवनाथ बन यांनी नमूद केले.


अजितदादांची मविआमध्ये यायची इच्छा होती असे सांगणा-या राऊतांना खडे बोल सुनावत नवनाथ बन म्हणाले की अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, एनडीएमध्ये सामील झाले होते याचे भान राऊतांनी ठेवावे. बाष्कळ दावे प्रतिदावे करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगीरी बंद करून वेब सीरीजचे लेखन सुरू करावे, त्यांचा तो धंदा चांगला चालेल असा टोमणा बन यांनी लगावला.


अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याच्या माध्यमातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. रोहित पवारांच्या पुढाकाराने आता संजय राऊत राज्यसभेमध्ये हा मुद्दा उचलून तो मार्गी लावणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदार असताना त्यांच्याऐवजी रोहित यांना राऊतांची गरज का भासली असा सवाल करीत बन म्हणाले की, शरद पवार गटाच्या खासदारांना हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेत उचलायला सांगण्याऐवजी प्रसिद्धीच्या हव्यासापायी रोहित हे रोज उठून पत्रकार परिषदांमधून बेफाम आरोप करत आहेत. स्टंटबाजीपेक्षा व्हीएसआर कंपनी संदर्भात असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांना द्यावे असेही ते म्हणाले.


अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात नाही तर अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला जातो. असा अहवाल यापूर्वीच दाखल झालेला आहे अशी माहिती देत बन यांनी रोहित यांना लक्ष्य केले. अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत हे ही अनेकदा सरकारने सांगूनही रोहित पवार प्रसिद्धीसाठी उतावीळ झाले आहेत. त्यासाठीच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा बालहट्ट रोहित पवारांनी धरला, या शब्दांत बन यांनी त्यांची खिल्ली उडवली.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे