मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर रविवारी एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण ही बॅग ठेवून जाताना दिसत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.


घटनेच्या तपशीलानुसार, नितेश राणे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान 'सुवर्णगड'बाहेर ही काळ्या रंगाची ट्रॉली बॅग रविवारी सकाळी आढळून आली. बेवारस बॅग सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि संपूर्ण क्षेत्र सील करण्यात आले. घटनास्थळी येण्या-जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत बॅगमध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सावधगिरी बाळगली.


सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचे स्पष्ट चित्रण समोर आले आहे. फुटेजनुसार, करड्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट आणि पँट घातलेला एक तरुण हातात ब्लॅक ट्रॉली बॅग घेऊन नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ येतो. तो तेथे बॅग ठेवून लगेच निघून जातो. या तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. हा तरुण कोण आहे, त्याने ही बॅग का ठेवली आणि त्यामागे काही उद्देश आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा शोध घेण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. तसेच, त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक मदत घेण्यात येत आहे. बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात एक चिठ्ठी आणि काही वस्तू आढळल्या. त्यात एक चिठ्ठी देखील आढळून आली असून, ‘या बॅगमध्ये बूट आणि कपडे आहेत. ते तुम्ही मोफत घेऊ शकता,’ असा मजकूर लिहिलेला आहे. बॅग ठेवायच्या भानगडीत पडू नये, अन्याथा अशा ठिकाणी बॅग ठेवीन की उरले सुरले संपून जाईल असा इशाराही नितेश राणे यांनी िदला.

Comments
Add Comment

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी