जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय


जम्मू : जम्मूकाश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाया सुरू केल्या आहेत. थुराया सॅटेलाइट फोनचा सिग्नल आणि त्यानंतर ड्रोन दिसल्याच्या घटना समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.


संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून येणारी ड्रोनसदृश उडती वस्तू एलओसी (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील विविध ठिकाणी आढळून आल्या. यामध्ये सायंकाळी ६ .२५ वाजता पूंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टरमध्ये टैनहून टोपाकडे एक संशयित ड्रोन जाताना दिसला.त्यानंतर ६. ३५ वाजता राजौरी जिल्ह्यातील टेरयाथमधील खब्बर गावाजवळ आणखी एक ड्रोन आढळून आला. त्यानंतर नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने एका ड्रोनवर गोळीबार केला, तसेच काउंटर-यूएव्ही (anti-drone) उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यानंतर ही उडती साधने पुन्हा सीमापार परतल्याचे निरीक्षणात आले.


सॅटेलाइट फोन सिग्नलमुळे वाढली चिंता


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ३.३० वाजता जम्मूजवळील कानाचक पोलीस ठाणे हद्दीत थुराया सॅटेलाइट फोनचा सिग्नल पकडला गेला. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या २ किमी अंतरावर असून, जम्मूपासून सुमारे १८ किमी वायव्येला आहे. हा परिसर पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून वापरला जाणारा घुसखोरी आणि समन्वयाचा परिचित मार्ग मानला जातो. त्यानंतर सायंकाळी ६.२५ वाजता मनकोटटोपा पट्ट्यात ड्रोन हालचाल दिसून आली, ज्यामुळे टोही (reconnaissance) किंवा सामग्री टाकण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुप्तचर सूत्रांच्या मते, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि ड्रोन हालचाली यामधील वेळेचा जवळचा संबंध हा एखाद्या संयोजित शत्रुत्वपूर्ण कारवाईचा संकेत देतो.


संयुक्त शोधमोहीम सुरू


या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, बीएसएफ, एसओजी आणि जम्मूकाश्मीर पोलीस यांच्या सहभागातून संयुक्त शोध व पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक विश्लेषणासह जमिनीवरील तपास, सिग्नल अ‍ॅनालिसिस आणि परिसरावर वर्चस्व (area domination) प्रस्थापित करण्यावर भर दिला जात आहे.


थुराया ही यूएईस्थित मोबाईल सॅटेलाइट सेवा देणारी कंपनी असून, तिचा वापर सामान्य मोबाइल नेटवर्कपासून दूर असलेल्या भागात संपर्कासाठी केला जातो. गुप्तचर यंत्रणांच्या प्राथमिक तपासात हा सॅटेलाइट सिग्नल मुद्दाम आणि ऑपरेशनल स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांच्या मते, सीमेपलिकडून हँडलर्सकडून भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा हालचाली मार्गदर्शनासाठी हे सिग्नल सक्रिय केले गेले असावेत. मनकोटटोपा पट्ट्यातील ड्रोन हालचाल ‘टेस्ट रन’ किंवा प्रयत्नात्मक कारवाई म्हणून तपासली जात आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्र झेडपी निवडणूक..!

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दाखल याचिकांवर आज (१२ जानेवारी २०२६)

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६; देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणार

मुंबई : देशाच्या राजकीय आणि आर्थिक हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं संसदचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ