मकरसंक्रांती २०२६, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मात मकरसंक्रांतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासना केल्यास मोठे पुण्य लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्वातील मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतात आणि याच दिवसापासून सूर्य उत्तरायणाला प्रारंभ करतो.



मकरसंक्रांती २०२६ कधी आहे?


२०२६ साली मकरसंक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे १४ की १५ जानेवारी या संभ्रमाला पूर्णविराम मिळतो.



भारताच्या विविध भागांत मकरसंक्रांती वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.


बिहार आणि उत्तर प्रदेशात — मकरसंक्रांती / खिचडी पर्व
पंजाब आणि हरियाणामध्ये — लोहडी
तामिळनाडूमध्ये — पोंगल
आसाममध्ये — माघ बिहू किंवा भोगली बिहू



मकरसंक्रांती २०२६ : पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ


पुण्यकाळ
दुपारी १५:१३ ते सायंकाळी १७:४५
कालावधी : २ तास ३२ मिनिटे


महापुण्यकाळ
दुपारी १५:१३ ते १६:५८
कालावधी : १ तास ४५ मिनिटे



दान–पुण्याचे धार्मिक महत्त्व


मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून सामाजिक ऐक्य जपला जातो. या दिवशी अन्नधान्य, तूप, तिळ, तांदूळ, डाळी, भाजीपाला, मीठ, खिचडी, वस्त्र आणि कम्बल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.


धार्मिक मान्यतेनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, समाधान टिकून राहते. तसेच या दिवशी श्रद्धेने सूर्यदेवाची उपासना केल्यास मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते, असे मानले जाते.

Comments
Add Comment

लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव 

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा

मराठी माध्यमच्या पोरांनी गाजवले थिएटर्स’! क्रांतीज्योती विद्यालय ११ दिवसांत १० कोटींच्या पार

मुंबई : मराठी सिनेविश्वासाठी नववर्षाची सुरुवात जल्लोषाची ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या