मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. यामुळे सर्व पक्षीयांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचार मोहिमेत एक वेगळीच झलक पाहायला मिळाली आहे. प्रसिद्ध उत्तर भारतीय लोकगायिका आणि भाजपच्या स्टार प्रचारक मैथिली ठाकूर यांनी थेट मुंबईच्या प्रचार मैदानात उतरत लक्ष वेधून घेतले आहे.


मैथिली ठाकूर मुंबईत दाखल झाल्या असून, दहिसर परिसरातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये त्यांनी रोड शोच्या माध्यमातून प्रचार केला. विशेष म्हणजे या प्रचारादरम्यान त्यांनी मराठी भाषेत गाणे सादर करत उपस्थित मतदारांना भावनिक साद घातली. रोड शोदरम्यान गायलेल्या मराठी गाण्याची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. या गाण्याच्या माध्यमातून मैथिली ठाकूर यांनी मराठी मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. उत्तर भारतीय आणि मराठी असा भेद न करता विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा संदेश त्यांनी दिला.


“उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र असे विभाग करून चालणार नाही. आपल्याला एकत्र काम करून पुढे जायचं आहे,” असं मत त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलं. लोकांना जोडून ठेवणं आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणं हाच आपला उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.



मीही उत्तर भारतीय मराठीच’


भाषा आणि प्रादेशिकतेच्या मुद्द्यावर बोलताना मैथिली ठाकूर यांनी ठाम भूमिका मांडली. “अरे भाऊ, असं वेगळं का पाहता? मीही उत्तर भारतीय मराठीच आहे,” असं सांगत त्यांनी मराठी अस्मितेशी आपलं नातं अधोरेखित केलं.



भाजपला विजयाचा विश्वास


प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी मुंबई हे आपलं दुसरं घर असल्याचं सांगितलं. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, येत्या निवडणुकीत भाजपला मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “लोकांना बदल हवा आहे आणि भाजपचा महापौर निवडून येईल,” असं मतही त्यांनी मांडलं.



मैथिली ठाकूर कोण आहेत?


मैथिली ठाकूर या मूळच्या लोकगायिका असून, रिअॅलिटी शोमधून त्या घराघरात पोहोचल्या. भारतासह परदेशातही त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहेत. गायन क्षेत्रात यश मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी अलीनगर मतदारसंघातून विजय मिळवत भाजपकडून आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. आता त्या महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

Comments
Add Comment

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी

मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता