मतदानाच्या दिवशी सुट्टी नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

तपासणीसाठी पालिकेच्यावतीने दक्षता पथकांची स्थापना


मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत गुरुवार,१५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी 'दक्षता पथक' स्थापन केले आहेत. हे पथक मतदानासाठी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ सुट्टी किंवा सवलत दिली आहे किंवा नाही याची तपासणी करेल आणि मतदान करण्यास सुट्टी तथा सवलत न देणाऱ्यांवर दुकाने आणि आस्थापना खात्यामार्फत कारवाई केली जाणार आहे.


मुंबईतील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच मुंबईतील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे. याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेही सार्वजनिक सुट्टीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल.


अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असेही अध्यादेशात नमूद आहे.


मुंबईतील दुकाने, कंपन्यांनी मतदानाच्यादिवशी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथकं नेमण्यात आली आहेत. नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक – ९१२२-३१५३३१८७ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.


मतदानाचा हक्क बजावावा, महापालिका आयुक्तांचे आवाहन


लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कामाच्या कारणाने मतदार मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मतदारांनी सक्रियपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा. गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.

Comments
Add Comment

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई