Nashik News: कडाक्याच्या थंडीने घेतला पहिला बळी, निफाडमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु

नाशिक:निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव (ता. निफाड) येथील २२ वर्षीय तरुणाचा अतिथंडीमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.


देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास समीर दौलत सोनवणे (वय २२) हा तरुण मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तत्काळ कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिथंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली असून, शुक्रवारी निफाड गहू कृषी संशोधन केंद्रात किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. याआधी गुरुवारी प्रथमच ५.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले होते. गुरुवारी रात्री प्रचंड गारठा जाणवत असल्याने रस्त्यांवरील वर्दळही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र होते.


नाशिक शहरातही तापमानाचा पारा घसरून शुक्रवारी ९.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या २४ तासांत तापमानात सुमारे दोन अंशांची घट झाली असून, मागील पाच दिवसांत पाच ते सहा अंश सेल्सिअसने तापमान कमी झाले आहे. हीच परिस्थिती जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.


कडाक्याची थंडी गहू, कांदा तसेच इतर रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार असली तरी वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी, उबदार कपडे वापरावेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

Nashik : SIR प्रक्रियेसाठी मतदारांनी १७ ऑगस्टपूर्वी एन्युमरेशन फॉर्म भरण्याचे आवाहन

Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेंतर्गत मतदार यादीतील नोंदी अद्ययावत

Nashik Kumbh Mela : अमृतस्नानाच्या दिवशीही ‘कम्युनिकेशन ब्लॅकआउट’ नाही, महासिंहस्थासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच

Nashik Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये महासिंहस्थाच्या प्रमुख पर्वकाळात सुमारे १२ कोटी भाविक दाखल होण्याचा

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील