कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची मालिकाही वाढत चालली आहे. सासरी होणारे छळ, लाखोंचे हुंडे, किंवा वंशाच्या दिव्यासाठी नवविवाहितेवर सतत होणारे अत्याचार यांना कंटाळून अनेक महिलांनी आपले जीवन संपवले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि शिरोळ तालुक्यातून विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या असून, सासरकडील मानसिक व शारीरिक छळामुळेच या आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली आहे.



करवीर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


करवीर तालुक्यातील कांडगाव येथे नवविवाहित प्रतीक्षा तुषार कांबळे हिने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पती तुषार कांबळे आणि सासरे सारंग कांबळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.



जयसिंगपूर-चिपरीत विवाहितेने पेट्रोल ओतून घेतला जीव


दुसरी घटना जयसिंगपूरजवळील चिपरी (ता. शिरोळ) येथून समोर आली आहे. येथे कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) हिने गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत तिला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.


या आत्महत्येप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. कीर्तीच्या लग्नाला बरीच वर्षे झाली तरी त्यांना बाळ नव्हते त्यामुळे सासरचे मंडळी नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देऊ अश्या तिला धमक्या द्यायचे, सासरच्या मंडळी सतत तिच्यावर' जाच, तिचा छळ करत होते. त्यामुळे मानसिक न शारीरिक तणावातूनच कीर्तीने हे पाऊल उचलले आहे. असे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.


या तक्रारीच्या आधारे जयसिंगपूर पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा आवळे, दीर अतुल आवळे आणि जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

वसई-विरार महापालिकेमध्ये २९ हजार दुबार मतदार बे‘पत्ता’

दुबार मतदान करणार नसल्याचे पाच हजार मतदारांकडून हमीपत्र विरार :वसई - विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या ५२ हजार

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

Pandharpur Temple | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विशेष नियोजन; १३ व १४ जानेवारीला दर्शन वेळापत्रकात बदल

पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात

पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा निर्णय; 'हे' दोन दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रकिया सुरुळीत पर पाडण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा

काळाने घातला घाला ; पंढरपुरातील अहिल्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा भीषण अपघात

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक हृदयपिळवणारा