धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २७ वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


चंद्रपूर शहरातील महाकाली वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर परिसरात राहणाऱ्या दीक्षा शुभम भडके या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पतीवर पत्नीला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, मृत्यूपूर्व जबाबातही पतीचेच नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शुभम भडके हा घरी आला. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली त्यानंतर त्याने पत्नी दीक्षाला पेटवून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.


आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता दीक्षा गंभीर अवस्थेत, पूर्णतः भाजलेली आढळून आली. तिला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण काय, पतीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस तपासातून घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे