बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा असंख्य बहिणींनी लाभही घेतला आणि सरकारला अनेक शुभाशीर्वादही दिले.
या योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांनी घ्यावा असे सरकारचे धोरण होते, परंतु काही ठिकाणी प्रचंड पैसे असलेल्या, अगदी आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या महिलांनीही पैसे फुकट पैसे मिळत आहेत. म्हणून या योजनेचा लाभ घेतला आणि यामुळे राजुत सर्वत्र खळबळ माजली.
ही बाब सरकारच्या लक्षात येताच अर्ज मागे घेण्यासाठी अनेक आवाहने ही करण्यात आली मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नाही. शेवटी सरकाराने कठोर कारवाई करत संबंधित महिलांकडून रक्कम वसुली करत कायदेशीर कारवाई हि केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागांत कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशीत १९० कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे कर्मचारी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र उर्वरित ६ शासकीय कर्मचारी अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले.
या सहा कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १६ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९९ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शासनाची फसवणूक करून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणे संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी या संपूर्ण कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.