पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव घाट पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासासाठी पुणेकरांची प्रचंड धांदल उडणार आहे. बोपदेव हा घाट फक्त सासवड - कोंढवा या ठिकाणच्या प्रवाश्यांसाठीच नाही तर पुरंदरसह अनेक तालुक्यांसाठी महत्वाचा दुवा आहे. बोपदेव घाट हा आजपासून ते पुढील ७ दिवसांपर्यत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.
बोपदेव घाट बंद करण्याचं कारण म्हणजे बोपदेव घाटात सुरु असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आजपासून बुधवार पर्यंत म्हणजेच १४ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने हे काम हाती घेतले असून कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग
घाट बंद ठेवण्यात येणार असलयाने प्रवाश्यांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले आहे.
बोपदेव घाटामध्ये दुरुस्तीचे काम सुरु राहणार असलयाने या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरु राहणार नसल्याने वाहनचालकांनी या घाटाच्या दिशेने जाऊच नये. त्याऐवजी नेमून दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आणि हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.