'ठाकरे बंधूंची भूमिका भेदभावाची, महायुतीची भूमिका बंधूभावाची'


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी भाषिक भेदभाव आणि प्रांतभेदभावाची भूमिका मांडून मुंबईतील वातावारण प्रदूषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे.मुंबईत भेदभावाचे वातावरण ठाकरे बंधूंना करायचे आहे. ठाकरे बंधूंची भूमिका जरी भेदभावाची असली तरी रिपब्लिकन पक्षाची आणि महायुतीची भूमिका बंधूभावाची आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.


मराठी ही आमची मातृभाषा आहे .आम्हाला मराठीचा अभिमान आहे.मराठी माणसासोबत उदरनिर्वाहसाठी आलेल्या परप्रांतीयांना सुद्धा रोजी रोटी देणारी मुंबापुरी ही भारताची आर्थिक राजधानी आहे.मुंबईच्या जडणघडणीत गरिब कष्टकऱ्यांचे मोठे योगदान आहे. आम्हाला कोणताही भेदभाव करायचा नाही.आपण सर्व भारतीय आहोत;याचा आपल्याला असला पाहिजे.मुंबई ही विविधतेने नटलेली आहे.या मुंबई मध्ये भेदभाव नाही तर बंधुभाव वाढवायचा आहे. बंधुभावातुनच एकमेकांचा विश्वास वाढवायचा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या या बंधूभावाच्या भूमिकेला मुंबईतील जनता भरभरुन साथ देईल असा वविश्वास रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


मुंबई अंधेरी येथे वॉर्ड क्र ६५ चे रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार जयंतीलाल गडा यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाला भेट दिल्या नंतर रामदास आठवले यांनी जयंतीलाल गडा यांना विजयी करण्याचे आवाहन केले.


रामदास आठवले यांनी अंधेरी,धारावी या भागांचा दौरा करुन रिपब्लिकन उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या धारावीतल वॉर्ड क्रमांक १८६ च्या कुमारी स्नेहा सिध्दर्थ कासारे यांच्या ही प्रचार कार्यलयाचे उद्घाटन या धारवी येथे करण्यात आले.त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई राज्यसरचिटनीस गौतम सोनावणे,मुंबई अध्यक्ष सिध्दर्थ कासारे,जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.


मुंबई शहराचा विकास होत आहे आणि त्यांच बरोबर लोकसंख्या ही वाढत आहे.मुंबई मध्ये मोठ-मोठे ब्रिज,उंच-उंच इमारती उभे करण्याचे जे कष्टकऱयांचे जे हात आहे.ते कष्टकरी जसे मराठी आहेत तसेच परप्रांतीय आहे.परंतु मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव कोणी करू नये.भेदभावाचे विष समाजामध्ये कोणी कालवू नये.जाती भेद,धर्म भेद,प्रांत भेद, भाषा भेद या भेदभावाच्या विषारी विचारातुन समाज मन कलुषित करू नये .महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समता,स्वातंत्र्य बंधुतेचा विचार दिला आहे.तोच बंधुत्वाचा विचार घेऊन रिपब्लिकन पक्ष काम करित आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतले आहे.उत्तर भारतील,दक्षिण भारतीय,गुजराती,मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समतेच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्ष बघतो.म्हणुन जयंतीलाल गडा सारख्या गुजराती माणसाला रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी दिली आहे.महायुती मध्ये जरि रिपब्लिकन पक्ष असला तरी भाजपने रिपब्लिकन पक्षाला एक ही जागा दिलेली नाही .त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने मुंबई शहरात स्व:बळावर १२ उमेदवार मैदानात उतरविले आहेत.मुंबईतील बाकी २१५ जागांवर भाजप,शिवसेना महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा


राज ठाकरे,उध्दव ठाकरे हे भेदभावची भूमिका मांडत आहेत. रिपब्लिकन पक्ष आणि महायुती ही बंधूभावाचा विचार पेरत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भेदभावाचा पराभव होईल आणि बंधूभावाचा विजय होईल. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्व:बळावर निवडून येतील. तसेच रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे महायुतीचा मुंबईत महापौर हाईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

BJP Foundation Day : भाजप स्थापना दिनाच्या पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले ...

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे