चिक्कमगलुरु : समाजात वडिलांना मुलीचे संरक्षक मानले जाते, मात्र कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यातून पितृत्वाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने पैशांच्या हव्यासापोटी आपल्या अल्पवयीन मुलीचा सौदा करून तिला वेश्यावृत्तीच्या विळख्यात ढकलले. विशेष म्हणजे, या घृणास्पद गुन्ह्यात मुलीच्या सख्ख्या आजीनेही सैतानाला साथ दिल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी वडील आणि आजीसह एकूण १२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
शिक्षणाची ओढ, पण नियतीचा क्रूर खेळ
पीडित मुलगी बिरूर येथील रहिवासी असून, काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. आईच्या पश्चात ती आपल्या नातेवाईकांकडे राहून जिद्दीने शिक्षण घेत होती. पीयूसी (१२ वी) पूर्ण केल्यानंतर, वडिलांचा आधार मिळेल या आशेने ती आपल्या घरी परतली. मात्र, ज्या घराकडून तिला संरक्षणाची अपेक्षा होती, तिथेच तिच्या शोषणाचा कट रचला जात होता. तिच्या स्वतःच्या वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मिळून तिला वेश्यावृत्तीच्या व्यवसायात ढकलले. या नराधम पित्याने मुलीला अमानवीय कृत्ये करण्यास भाग पाडले. मुलीने वारंवार नकार दिला, रडून विनवणी केली, मात्र पैशांच्या मोहात आंधळ्या झालेल्या पित्याने पोटच्या मुलीचा टाहो ऐकला नाही. अखेर या अत्याचाराची माहिती समोर येताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या 'सॅक्स रॅकेट'चा पर्दाफाश केला. पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षिततेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध कायमच ...
फक्त ५ हजारांसाठी पित्याने मुलीला विकलं
डिसेंबर महिन्याचा तो काळ पीडित मुलीसाठी काळरात्र ठरला. तिचे वडील तिला घेऊन आजीकडे गेले होते. दोन दिवस तिथे राहून पुन्हा घरी परतायचं असं मुलीला वाटलं होतं. पण त्या दोन दिवसांच्या मुक्कामात आजी आणि वडिलांनी मिळून तिच्या आयुष्याचा सौदा आधीच पक्का केला होता. तिथेच त्यांची भेट भरत शेट्टी नावाच्या एका दलालाशी झाली. त्याने बापाला पैशांचं अमिष दाखवलं आणि तिथूनच या मुलीच्या छळाला सुरुवात झाली. भरत शेट्टीने वडिलांना असं पटवून दिलं की, "जर तुझी मुलगी या धंद्यात आली, तर ती दररोज ५ हजार रुपये सहज कमवेल." पैशांच्या आकड्यांनी या बापाचे डोळे इतके दिपले की, त्याला आपल्या लेकीचा चेहराही दिसला नाही. पोटच्या पोरीच्या सन्मानापेक्षा त्याला तो '५ हजार रुपयांचा रोज' मोठा वाटला.
मंगळुरु नेले आणि दोन दिवस नको ते घडलं
आरोपी वडील आपल्या मुलीसह भरत शेट्टीसोबत मंगळुरुला गेले. रस्त्यात मुलीने वडिलांना सांगितले की ती मासिक पाळीमध्ये (Periods) आहे आणि आजारी आहे. पण लालची वडिलांचे हृदय पाझरले नाही. दुसऱ्या दिवशी भरत शेट्टीने मुलीला धमकावले की काही लोक येतील आणि तिला त्यांच्यासोबत संबंध ठेवावे लागतील.
पीडितेने पोलिसांना काय-काय सांगितले?
- २० ते ४५ वर्षे वयाच्या चार पुरुषांनी तिच्यासोबत वारंवार बलात्कार केला.
- जेव्हा मुलीने विरोध केला आणि आपले वय सांगून सोडण्याची भीक मागितली, तेव्हा आरोपींनी तिचे एकही ऐकले नाही.
- आरोपी भरत शेट्टीला पैसे देऊन ते सतत दोन दिवस पीडितेचा लैंगिक शोषण करत राहिले.
हिम्मत गोळा करून अल्पवयीनने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसात खळबळ उडाली. पोलिसांनी जलद कारवाई करत पीडितेचे वडील, आजी आणि मुख्य आरोपी भरत शेट्टीसह एकूण १२ लोकांना अटक केली आहे. तपासात समोर आले आहे की भरत शेट्टी दक्षिण कन्नड जिल्ह्यात देह व्यापाराचे मोठे नेटवर्क चालवतो. भारत शेट्टीवर मंगळुरु आणि उडुपीमध्ये यापूर्वीच वेश्यावृत्तीचे ८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिस आता या टोळीशी संबंधित इतर लोकांच्या शोधात छापेमारी करत आहेत.