मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा महायुती तसेच उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप)यांची आघाडी असली तरी मुंबईतील सात प्रभागांमध्ये ही महायुती किंवा आघाडी दिसून येत नाही. तर या चार प्रभागांमध्ये हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून यात कुणाचा बळी जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपची युती झाली असली तरी प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक १४३, प्रभाग क्रमांक १७५ यामध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे उमेदवारी प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत. त्यामुळे या दोन प्रभागांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
तर प्रभाग क्रमांक ३४, प्रभाग क्रमांक १७३ आणि प्रभाग क्रमांक २२५मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळणार आहे.
या तिन्ही प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत. तर प्रभाग क्रमांक १७९मध्ये शिवसेना विरुद्ध रिपाइं आठवले यांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे, तसेच याच प्रभागांत उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या उमेदवारांनीही स्वतंत्र अर्ज भरले आहे. तर प्रभाग १५०मध्ये शिवसेना विरुद्ध रिपाइं आठवले यांच्या पक्षाचे उमेदवार आमने-सामने आहेत.
महायुती आणि आघाडीचे उमेदवारच असलेले प्रभाग
प्रभाग क्रमांक ३४
सॅम्युअल डेनिस भाजप विजय महाडिक, शिवसेना
प्रभाग क्रमांक १४३
प्रांजल प्रशांत राणे, मनसे रेहमत खान, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
प्रभाग क्रमांक १५०
वनिता कोकरे, भाजप अंसारी आयेशा अली (रिपाइं आठवले)
प्रभाग क्रमांक १७५
अर्चना कासले, मनसे आरती राजेंद्र देवेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
प्रभाग क्रमांक १७९
सरदार शमाबी यासिन, शिवसेना भारती पांडे, (रिपाइं आठवले)
प्रभाग क्रमांक १७९
दीपाली सचिन खेडेकर, उबाठा भारती पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस, शप
प्रभाग क्रमांक १७३
पूजा रामदास कांबळे, शिवसेना शिल्पा केळुसकर, भाजप
प्रभाग क्रमांक २२५
हर्षिता नार्वेकर, भाजप सुजाता सानप, शिवसेना