मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक १०७ राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या बिनविरोध निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) उमेदवाराचा अर्ज रद्द झाला, तर काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. मात्र, उबाठा सेनेने शेवटच्या क्षणी बंडखोर उमेदवार दिनेश जाधव यांना पाठिंबा देत भाजपला आव्हान दिले. त्यामुळे नील सोमय्यांची बिनविरोध निवडणूक रोखली गेली असून प्रभाग १०७ मध्ये थेट लढत रंगणार आहे.