'अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका'

मुंबई: काॅग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून,त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी दुरान्वये माझा संबंध नाही.उलट अकारी पडीत जमीन मूळ मालकांना परत मिळाव्यात हीच आपली भूमिका आहे.तसे पत्रही महसूल मंत्र्यांना दिले आहे.परंतू अपुर्या माहीतीवर केलेल्या आरोपाबाबत वडेट्टीवार यांनी माफी मागितली पाहीजे अन्यथा मलाही कायदेशीर मार्ग अवलंबावा लागणार असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


विधानसभेत वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणेच आकारी पडीत शेतकऱ्यांचा संघर्ष मोठा झाला आहे.लोकनेते बाळासाहेब विखे पाटील आणि काॅम्रेड माधवराव गायकवाड यांनी केलेल्या लढ्याला अनेक वर्षानंतर यश आले.यासाठी विधानसभेत ठराव झाले.राष्ट्रपती भवनाची मंजुरी घ्यावी लागली.मोठ्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना जमीनी देण्याचा निर्णय झाला.त्यावेळी असे आरोप झाले नाहीत.


खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनी अहील्यानगर सोलापूर जिल्ह्यात असल्याने विदर्भातील असलेल्या विजय वडेट्टीवार यांना प्रश्नाची फार जाण नाही.आजही त्यांनी आरोप करण्यापुर्वी मला भेटून माहीती घ्यायला पाहीजे होती.श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना परत करता येणार नाहीत आशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती.महायुती सरकार मध्ये महसूल मंत्री झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने निर्णय केला.मात्र राज्यपाल महोदयांना राष्ट्रपतीच्या अभिप्रायाची गरज आवश्यक वाटत आहे.


हरेगाव मळ्यातील मूळ मालकांना जमीनी परत मिळाव्यात यासाठी लढा सूरू असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की,मूळ मालकांना सिलींग मर्यादेत जमीन परत करणेबाबत निर्णय घ्यावा यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण स्वता पत्र दिले असून मूळ मालकांचे क्षेत्र निश्चित झाल्यानंतर उरर्वित क्षैत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करणे योग्य होणार असल्याची बाब मंत्रीमंडळ उपसमितीकडेही मांडली आहे.


मात्र कोणतीही पार्श्वभूमी विचारात न घेता किंवा माझा कोणत्याही बाबीशी संबंध नसताना विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाचे आश्चर्य वाटत असून एकतर त्यांनी माफी मागावी अन्यथा मला कायदेशीर मार्ग स्विकारावा लागेल असा स्पष्ट इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

Comments
Add Comment

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Nashik : आई-बाबा घराबाहेर पडले अन् घरी येताच पायाखालची जमीन सरकली, दोन चिमुकल्या लेकींचा मृत्यू ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं

Nashik TCS Case : एमएआयएम नगरसेवक मतीन पटेलला जामीन

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (TCS Company) अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात

Nashik : कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गिरीश महाजन

Nashik : कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.