सध्या सोशल मीडियावर 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केल आहे. या चित्रपटात मराठी प्रसिद्ध अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रला दिसणार आहे.
शिवराज अष्टकच्या सहाव्या शिवपुष्पातून चिन्मय मांडलेकरांची एक्झिट झाली असून अभिजित श्वेतचंद्र शिवरायांची भूमिका साकरणार आहे. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथम दर्शन सोहळा पार पडला आहे. यावेळी चित्रपटातील 'महारुद्र शिवराय' या गीताचे उत्तम सादरीकरण करण्यात आले. या सोहळ्याला पाहून सगळ्यांचे मन भरून आले.
शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची , कर्तृत्वाची खरी झलक दिसली . महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती या चित्रपटाच्या माध्यमतून पाहायला मिळणार आहे.