अभिनेत्री, निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपिका पादुकोण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नव्या आणि तरुण क्रिएटिव टॅलेंटला पुढे आणण्यासाठी एक नवी पहल सुरू केली आहे. खऱ्या कथा आणि नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या विचाराला पुढे नेत, दीपिकाने आज ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या सुरुवातीची घोषणा केली. हा त्यांच्या Create With Me प्लॅटफॉर्मचा पुढील टप्पा असून, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नव्या क्रिएटिव कलाकारांना संधी देणे हा यामागचा उद्देश आहे. त्यांची प्रतिभा पाहिली जावी, ऐकली जावी आणि योग्य प्रकारे समोर यावी, यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/DTHWjwdkuMR/?igsh=MXR4OWs2aHMzcGUzOQ==
हा प्रोग्राम जिथे गुणवंत आणि होतकरू लोकांना शिकण्याच्या संधी देईल, तिथेच ज्यांच्याकडे स्वतःचे प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव आणि कौशल्य आहे, अशा लोकांसाठीही पुढे जाण्याचे व्यासपीठ ठरेल. पहिल्या टप्प्यात लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, लाईट, एडिटिंग, साउंड, आर्ट, कॉस्च्युम डिझाइन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा विभागांचा समावेश असेल.
आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिकाने म्हटले, “गेल्या एक वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्कृष्ट क्रिएटिव टॅलेंटला ओळखणे आणि त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी एक मंच देण्याची भावना माझ्या मनात खोलवर आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढील पिढीतील क्रिएटिव टॅलेंटशी तुम्हा सर्वांची ओळख करून देण्याची मला उत्सुकता आहे.”
देश आणि परदेशातील क्रिएटिव टॅलेंटला ओळखण्याच्या आपल्या व्हिजनला पुढे नेत, दीपिका पादुकोण यांचा द ऑनसेट प्रोग्राम आता https://onsetprogram.in/ येथे पाहता येईल, जिथे इच्छुक लोक आपले काम पाठवू शकतात आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्तम लोकांसोबत काम करण्याची संधी मिळवू शकतात.