आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

मुंबई : चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईमध्ये शुक्रवार ९ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांमधील वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांचा यंदा महोत्सवात समावेश असल्यानं सिनेप्रेमींसाठी ही मेजवानी ठरेल.


यंदाच्या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण आहे ते मराठमोळ्या कलावंताचे सिनेमे. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी सिनेमा ‘मयसभा' आणि नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा ‘उत्तर’ आणि दिग्दर्शक संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ आदी कलाकृतींचा समावेश आहे. सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.


निवडलेले चित्रपट प्रभादेवीतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. ९ दिवसांच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे सशुल्क रजिस्ट्रेशन आजच करा आणि एकापेक्षा एक लक्षणीय चित्रपटांचा आनंद घ्या. अतिशय वाजवी शुल्कात प्रतिनिधी नोंदणीकरण्यासाठी www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही जर प्रभात चित्र मंडळाचे सभासद असाल तर तुम्हाला खास सवलत आहेच. महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' देण्यात येणार आहे. आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात
येणार आहे.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर मनोरंजन विश्वातिल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

अ‍ॅटलीने दीपिका पादुकोणला म्हटले ‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार अगदी नवा अवतार

मुंबई : दिग्दर्शक अ‍ॅटली यांचा आगामी चित्रपट, ज्याला सध्या AA22XA6 असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे, अधिकृत

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे

Konkan Hearted Girl : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने शेअर केली गुड न्यूज; घरी आली नवी ‘लक्ष्मी’...

बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी