ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं टिपू पठाण कनेक्शन उघड; जाचाला कंटाळून 'मोक्का'तील फरार आरोपीने स्वत:ला संपवलं

पुणे : पुण्याच्या राजकीय वर्तुळातून उमेदवारा बाबत एक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीने अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच नाव सादिक कपूर असून तो मकोकामधील फरार आरोपी होता.



प्रशांत जगताप यांना लिहिलेलं पत्र


२० डिसेंबर रोजी सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी पुरावा म्हणून एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे ) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप याना लिहिल्याचं समोर आलं आहे. पत्रात अनेक खुलासे केले आहेत. जीवाला असलेला धोका आणि दबावाबाबत लिहिले आहे.



पत्रातील खुलासे


पत्रातील आरोपांनुसार राष्ट्रवादी उमेदवार फारुख इनामदार (शेख) हा टिपू पठाण टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्याकडून प्रचंड त्रास दिला जात आहे. वरिष्ठांनी हस्तक्षेप करून याला वेळीच रोखा अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे केली होती.



का उचलले टोकाचे पाऊल?


दुर्दैवाने या पत्राची वेळीच दखल न घेतल्याने त्रास अधिकच वाढला आणि सादिक कपूर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिहिलेल्या ३० पानांच्या सुसाईड नोट मध्ये आणि हातावर लिहिलेल्या मजकुरात फारूक इनामदार यांचे नाव आढळल्याने आता पोलिसांवरही दबाव वाढला आहे. या पत्रामुळे सादिक आणि फारूक यांच्यातील वाद केवळ जमिनीपुरता नसून त्याला गुन्हेगारी आणि राजकीय पदरही असल्याचे स्प्ष्ट होत आहे.



पोलिस तपास


दरम्यान, पुणे पोलीस आता या जुन्या पत्राचा आणि सुसाईड नोटचा आधार घेऊन तपासाची चक्रे फिरवत आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत एका उमेदवाराचे नाव अशा प्रकारे गुन्हेगारी टोळीशी जोडले गेल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासोबतच्या 'मोक्का' गुन्ह्यात पाहिजे होता.

Comments
Add Comment

१ फेब्रुवारी रोजी रविवार आल्याने अर्थसंकल्प कधी ?

२८ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी १

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

नगरसेवक बिनविरोध आल्याने काहींना मिर्ची झोंबली!

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला धुळे (प्रतिनिधी) : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या