लग्नाच्या दहा दिवसांतच मोठा धक्का; हनिमूनऐवजी जेलवारी, मराठी बिग बॉस फेम जय दुधाणेला अटक

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली जयला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. हनिमूनसाठी निघालेल्या जयची थेट जेलवारी झाल्याने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.


ठाण्याचा रहिवासी असलेला जय दुधाणे हा अभिनेता असण्यासोबतच व्यावसायिकही आहे. प्राथमिक तपासात जिम व्यवसायाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून दुकानांची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. एकाच दुकानाची विक्री वेगवेगळ्या व्यक्तींना करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.


या प्रकरणात जयने अनेक नागरिकांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची सांगितले जात आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचे गंभीर कलम लावले असून पुढील तपास सुरू आहे.


या गुन्ह्यात केवळ जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये जयची आई, बहीण, आजी आणि आजोबांची नावे असून पोलिसांकडून त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. अटकेनंतर जयला न्यायालयात हजर करण्यात आले असून या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, जय दुधाणेच्या वैयक्तिक आयुष्यातही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी त्याने थाटामाटात विवाह केला होता. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असतानाच अवघ्या दहा दिवसांतच जयवर अटकेची कारवाई झाल्याने त्याच्या पत्नीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.


जयने आपल्या करिअरची सुरुवात स्प्लिट्सविला १३ या रिअलिटी शोमधून केली होती. या शोचा विजेता ठरल्यानंतर त्याने बिग बॉस मराठी ३ मध्ये उपविजेतेपद मिळवलं. त्यानंतर 'गडद अंधार' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपली ओळख निर्माण केली.


पोलीस तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे

विविध चित्रपट आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता वकील बनून सत्यासाठी

धर्मेंद्र यांच्या घरात खरंच पडली का फूट ? अखेर हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या

Hema Malini On Dharmendra Separate Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अ

विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ची कथा आणखी गडद होणार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार प्रदर्शित

विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लिमिटेड यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2’, ज्याचे

Ranapati Shivray Swari Agra : दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

सध्या सोशल मीडियावर 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज

काही लोक Ai चा वापर करून माझ्या नावाने...'फेक न्यूज' पसरवणाऱ्यांवर अथर्व सुदामेचा संताप!"

मुंबई : अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुणे महानगर परिवहन

दीपिका पादुकोणने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, नव्या क्रिएटिव पिढीला पुढे नेण्यासाठी ‘द ऑनसेट प्रोग्राम’चा शुभारंभ

अभिनेत्री, निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपिका पादुकोण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नव्या आणि