माओवादी कमांडर बारसे देवाचे तेलंगणात आत्मसमर्पण

तेलंगणा : ‎छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा व दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा ऊर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर १ जानेवारीला रात्री आत्मसमर्पण केले आहे. देवावर ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचे एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये मोठी फूट पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. ‎काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी जहाल कमांडर म्हणून माडवी हिडमा याचा खात्मा केला होता. तेव्हापासूनच बारसे देवा दहशतीखाली होता. केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन कगार’ आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे अखेर बारसे देवाने मध्यस्थांमार्फत चार राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला.
Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'